पिंपरी: ‘पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. त्यासंबंधित कामे काहीही करून वेळेत पूर्ण करा. काही अडचणी आल्यास माझ्याशी बोला, पण कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे कामही तातडीने पूर्ण करा, प्रकल्प अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांची बुधवारी कानउघाडणी केली.
Success Story: बोअरमधून पंप काढण्याचे बनविले मशिन; जुगाडातून उभारला कोटींचा उद्योग, धनाजी सुर्वे यांची भरारी!शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हा पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या कामाची पाहणी आयुक्तांनी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या समवेत केली.
कामांची सद्यःस्थिती, प्रगती आणि तांत्रिक कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, अनिल भालसाखळे, महेश कावळे आदी उपस्थित होते. प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यातील पाणी गरजांची पूर्तता करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, असे नमूद करून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सांगितले.
प्रकल्प लवकर पूर्ण करा ः महापौर
पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करा, असा आदेश महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. हायड्रॉलिक, जीआय आणि स्ट्रक्चरल डिझाइनबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रकल्पामुळे शहरातील अनेक भागांतील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना! कामांची माहितीवाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्र
तळेगाव येथील ब्रेकप्रेशर टँकपर्यंत टाकण्यात येणाऱ्या ७.३० किलोमीटर लांबीच्या १७०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम
नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकच्या उभारणीसंदर्भात आवश्यक तांत्रिक प्रक्रिया
चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या १८.८० किलोमीटर लांबीच्या १४०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम
चिखलीतील २०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची कामे