श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी रामेश्वरम येथील सात मच्छीमारांना अटक केली आहे. या मच्छीमारांवर बेकायदेशीरपणे मासे पकडण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नौदलाने या कारवाईत मासे पकडणाऱया दोन मशिनी बोटी (ट्रॉलर) लाही जप्त केले आहे. मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरम मासेमारी केंद्रातून एकूण 365 टोकन जारी करण्यात आले होते. अटक केलेले मच्छीमार हे दोन बोटीतून जात होते. ते नेदुनथीव द्वीपजवळ मासेमारी करत होते. त्याचवेळी श्रीलंकेच्या अधिकाऱयांनी त्यांना रोखले आणि अटक केली.







