IPL 2026 प्लेऑफ अंदाज: आयपीएल (IPL) 2026 च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा गुरुवार 26 मार्च 2026 रोजी करण्यात आली. यापूर्वी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे फक्त पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. 28 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीतील सामने आधीच निश्चित करण्यात आले होते. आता निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर बीसीसीआय (BCCI) ने 13 मार्च ते 24 मे दरम्यान होणाऱ्या उर्वरित सामन्यांचं पूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी आयपीएल 2026 संदर्भात मोठी भविष्यवाणी केली असून, प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचू शकतात याबाबत आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे दोन संघ सध्या कागदावर सर्वात मजबूत दिसत असून, हे दोन्ही संघ लीग टप्प्यात अव्वल दोन स्थानांवर राहू शकतात.
चोप्रांची मोठी भविष्यवाणी
आकाश चोप्रा यांनी आपल्या चॅनेलवर बोलताना सांगितले की, “ही निवड करणे खूप कठीण आहे. फॉर्म, फिटनेस, पिच, नशीब अशा अनेक गोष्टींवर निकाल अवलंबून असतो. पण जर सर्व काही सुरळीत राहिले, तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ टॉप-2 मध्ये असायला हवेत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, दोन्ही संघांमध्ये दमदार खेळाडू असून, सातत्य टिकवले तर प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. त्यांच्या मते, पंजाब किंग्स हा तिसरा संघ म्हणून पात्र ठरेल, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर प्लेऑफमध्ये पोहोचेल.
मात्र, आरसीबी संघासाठी सध्या परिस्थिती फारशी अनुकूल नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काही महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे संघावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः नुवान थुशारा याच्याबाबतची बातमी समोर आल्यानंतर आरसीबीच्या अडचणी वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. तरीसुद्धा, इतर संघांच्या तुलनेत आरसीबीकडे असलेली मजबूत आणि सखोल संघरचना पाहता ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील, असा विश्वास चोप्रा यांनी व्यक्त केला.
गुजरात अन् लखनौ देणार आव्हान, तर…
याशिवाय, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीत जोरदार आव्हान देऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांना यंदा प्लेऑफमध्ये पोहोचणं थोडं कठीण जाऊ शकतं, असं त्यांचं मत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा