युद्धभूमीत आणखी एक देश घेणार उडी, भारतापुढे सर्वात मोठं संकट, तब्बल 42 लाख लोक…झोप उडवणारी माहिती समोर!
GH News March 28, 2026 09:12 PM

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगात भीती निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी इराणकडून आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आखाती देशही इराणवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळेच आता या युद्धाची व्याप्ती वाढून आणखी एक देश या युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता जर खरी ठरली तर मात्र भविष्यात मोठा नरसंहार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडतंय?

अमेरिका आणि इस्त्रायलचा प्रतिकार करताना इराण देश आखातातील संयुक्त अरब अमिरातीवर सातत्याने हल्ले करत आहे. या देशावर इराणने आतापर्यंत 2200 ड्रोन, क्षेपणास्त्र डागले आहेत. त्यामुळेच यूएई इराणवर प्रचंड रागावलेला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे संयुक्त अरब अमिरातीने प्रत्युत्तर देणाचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे, असा इशारा अनेकदा दिलेला आहे. त्यामुळे यूएई हा देशदेखील भविष्यात युद्धात उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

42 लाख भारतीयांची सुरक्षा धोक्यात

वॉल स्ट्रिट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार यूएई हा देश सध्या वाट पाहतो आहे. हा देश लवकरच इराणविरोधात युद्धात उतरू शकतो. हा देश जर युद्धात उतरला तर त्याचा थेट फटका भारताला बसणार आहे. कारण यूएईमध्ये काम करण्यासाठी, नोकरीला गेलेल्या भारतीयांचे प्रमाण खूपच जास्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार साधारण 42 लाख भारतीय लोक यूएईमध्ये राहतात. हे प्रमाण यूएईच्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के आहे. यूएई युद्धात उतरला तर या सर्व 42 लाख लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. भारताला या लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलावी लागू शकतात. त्यामुळेच अशा स्थितीत भारताचा चांगला कस लागू शकतो. दरम्यान, आता भविष्यात नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.