भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना
तरुणी नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर परिसरात उभी असताना अपघात
भरधाव कारची ४ ते ५ दुचाकींना धडक, अपघातात एका तरुणीचा मृत्यू तर ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती
वृद्ध कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Bhandara News : भंडाऱ्यात बांबूच्या झाडांना भीषण आगवाढती उष्णता आणि विद्युत प्रवाहित तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत बांबूंचे झुळूक मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेत. नगरसेविका वैशाली लांजेवार यांनी समय सूचकता दाखवीत नागरिकांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची घटना भंडाऱ्याच्या साकोलीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये घडली.
भिवंडीत गॅस लायटर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आगभिवंडी तालुक्यातील पडघा नजिकच्या सापे गावात गोदामास भीषण आग...
गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागण्याची घटना...
भिवंडी तालुक्यातील कल्याण पडघे रस्त्यावरील सापे ग्रामपंचायतीच्या हद्दीत
Ypm म्युनिफक्युचुलर गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.
लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - देवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देशातील इंधन व गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला असून, भारतात कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही जण जाणीवपूर्वक लॉकडाऊन किंवा पुरवठा खंडित होणार अशा अफवा पसरवत असून, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
raigad live : रायगडच्या पालीमध्ये घराला आगपालीमधील माणगाव बुद्रुक येथील धनगरवाडीवरील घटना
शॉक सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
आगीत घरातील धान्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य यासह घरातील इतर वस्तू जळून खाक
Pune Live : पुणे लष्कर कोर्टाने स्वयंघोषित धर्मगुरु आरोपी ऋषिकेश वैद्यला ६.एप्रिलपर्यंत सुनावली पोलिस कोठडीपुणे लष्कर कोर्टाने स्वयंघोषित धर्मगुरु आरोपी ऋषिकेश वैद्यला ६.एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या वकिलाने बचावावेळी "वैद्य विरोधात उशीर झाला नाही गुन्हा दाखल करायला. फिर्यादी ने फेसबुक वर requst पाठवली होतो. लैंगिक अत्याचार केला नाही आरोपीने. मोबाईल सगळे घेतले आहेत. मेसेज दोघांच्याही मोबाईल वर आहे.लॉज वर गेले असे म्हटले आहे तर cctv चेक करावा.असा गुन्हा घडला नाही. सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत" असं म्हटलं आहे.
Vasai Live : "वैद्यची पोलिसाविरोधात तक्रार नाही" - पोलिसांचं स्पष्टीकरणवैद्यची पोलिसाविरोधात तक्रार नाही
महादेव अवतार आहे म्हणून अत्याचार केला आहे
व्हिडीओ फोटो चॅटिंग गाडी जप्त करायची आहे
दुसऱ्या महिलाना फसवले आहे का याची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी हवी आहे
आरोपी चे मोबाईल जप्त करायचा आहे
व्हिडीओ काढले आहेत ते कुठे सोशल मिडियाला दिले आहे का याचा तपास करायचा आहे
पुणे वसई मध्ये घेऊन गेला होता याचा तपास करावा लागणार आहे
इतर कुठल्या जागी गेला होता का याचा तपास करायचा आहे
10 दिवस तरी पोलिस कोठडी देण्यात यावी
Pune Live : पुण्यातील स्वारगेट महर्षीनगरमध्ये दुकानासमोर डोसा हातगाडी लावणाऱ्यावर कोयतेने हल्लापुण्यातील स्वारगेट महर्षीनगरमध्ये दुकानासमोर डोसा हातगाडी लावणाऱ्यावर कोयतेने हल्ला
हातगाडी लावण्यावरून वाद
गेल्या अनेक दिवसांपासून हातगाडी लावण्यावरून वाद होते.
अखेर हॉटेल चालकाकडून गाडी वाल्याच्या उजव्या हातावर कोयता मारून हा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहे..
Pune Live : पुण्यात दोन तरुणांवर धारधार शस्त्राने वारपुण्यात दोघांवर धारधार शास्त्राने वार
पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
महर्षी नगर परिसरात हात गाडी लावण्यावरून झाला वाद
दोन तरुणांना बेदम मारहाण करत धारदार शास्त्राने केला हल्ला
हल्ल्यात एकाच हात तुटल्याची माहिती
हातगाडी लावण्याच्या कारणावरून हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने हल्ला, या हल्ल्यात हॉटेल मालकाचा हात तोडला तर कामगार जखमी असल्याची पोलिसांची माहिती
दोघांवर हल्ला करत आरोपी फरार
किशोर राजू बनसोडे आणि प्रसाद अस हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांची नावे
Nanded Live : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदीआज सकाळी ६ वाजल्यापासून ते ११ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू राहील. पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असेल. पोलिस व इतर शासकीय कर्मचारी, तसेच विवाहसोहळे, अंत्ययात्रा आणि पूर्वपरवानगी घेतलेल्या धार्मिक मिरवणुकांना या बंदीपासून सूट राहील. सभा, मोर्चे, मिरवणुका आणि ध्वनीक्षेपक वापरासाठी परवानगी देण्याचा अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल.
8 जुलैला होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थानआषाढी यात्रा नियोजनाची आज पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीमध्ये आठ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपुरकडे प्रस्थान होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 24 जुलै रोजी पंढरपुरात येईल. 25 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे. दुपारी चार ऐवजी तीन वाजता यंदा प्रस्थान होणार आहे. या अनुषंगाने आज वारकरी महाराज मंडळी आणि आळंदी संस्थांच्या वतीने पंढरपुरात परंपरेप्रमाणे बैठक घेण्यात आली.
Kalyan Live : मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना सीसीटीव्हीत कैदकल्याण पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मद्यधुंद तरुणांनी रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या दुचाकीची तोडफोड केली आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे
हातकणंगले तालुक्यात ऊस शेताच्या बांधावर गाजांची झाडेहातकणंगले तालुक्यात ऊस शेताच्या बांधावर गाजांची झाडे
हातकणंगले तालुक्यातील आळते गावात ऊस शेताच्या बांधावर गाजांची झाडे लावल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई..
६ ते ८ फूट उंचीची गांजाची ८ झाडे सरबांदावर लावल्या प्रकरणी छापा टाकून पोलिसांची कारवाई..
सुकुमार भूपाल चौगुले (वय ७२ ) रा. ढवळे मळा आळते याला अटक..
१७ किलो वजनाची व २ लाख ५२ हाजार रुपयांची गांजाची झाडे जप्त..
गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्यागोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
गोराईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही बातमी आहे. नारायण पिजी गेस्ट हाऊसमध्ये भाडेतत्वावर ही महिला राहत होती.
नाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुव नगर येथे बिबट्याचा वावरनाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुव नगर येथे बिबट्याचा वावर
- नाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुव नगर येथे बिबट्या दिसल्याची माहिती
- नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर सर्च मोहीम सुरू
- वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल
- नागरीवस्तीमध्ये बिबट्या दिसल्याने उडाला गोंधळ
नंदुरबारमध्ये गॅस आणि इंधनाचा मुबलक साठानंदुरबारमध्ये गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा
नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाच्या कुठेही तुटवडा दिसून येत नाही आहे. जिल्ह्यात गॅस आणि इंधनाच्या आढावा घेतला असून मुबलक प्रमाणावर इंधन आणि गॅस उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरू नाही जिल्हाधिकारी मित्तली सेठी यांचे आवाहन. दररोज सुमारे 7 हजार गॅस सिलेंडरचे वितरण केले जात असून, 13 हजारांहून अधिक सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे. म्हणजेच, किमान तीन दिवस पुरेल इतका गॅस साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळावा यासाठी व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे.
याआधी एका मिनिटाला सुमारे 200 बुकिंग होत होती, मात्र आता ही क्षमता 400 पेक्षा अधिक बुकिंगपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर इंधनाचाही साठा मुबलक असून, जिल्ह्यातील 86 पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेलचा नियमित पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, नागरिकांना काही अडचण आल्यास HPCL, BPCL आणि IOCL कंपन्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांनी केले आहे. एकूणच, नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Kolhapur Live: कोल्हापूरमध्ये अंबप रोडवर भीषण आग; शेती आणि झाडांना मोठा फटकाकोल्हापूरमध्ये अंबप वठार मार्गावर सुमारे पंचवीस एकर क्षेत्रामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत गवतासह आंबा आणि सागवान झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही हानी परवडणारी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Delhi Live: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंगदिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाने आपत्कालीन लँडिंग केले आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
Nashik Live : येवला बाजार समिती सहा दिवस बंद, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतनाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सलग सहा दिवस बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मार्च अखेर बँकेला सुट्टी व इतर सार्वजनिक सुट्ट्यांमुळे कांद्यासह इतर भुसार धान्य लिलाव बंद राहणार आहे, आधीच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना आता लिलाव प्रक्रियाच ठप्प झाल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. बाजार समिती बंद असल्याने नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी आता शुकशुकाट बघण्यास मिळत आहे.
Nashik Live : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशीनाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याची SIT कडून आज सलग दहाव्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. तपास पथकाने त्याला गोपनीय स्थळी नेले असून, काल रात्री दाखल झालेल्या दोन नव्या गुन्ह्यांच्या अनुषंगानेही त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी ऑटो रिक्षासाठी एलपीजीचा पुरवठा कमीछत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी ऑटो रिक्षासाठी एलपीजीचा पुरवठा कमी होत असल्यामुळे अर्धा अर्धा दिवस ऑटोरिक्षा चालकाला रांगेत उभे राहावे लागत आहे. वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका एलपीजी पंपावरची ही रांग तब्बल दोन अडीच किलोमीटरवर लागली आहे. या रांगेत उभे राहूनही LPG गॅस मिळत नाही, त्यामुळं रिक्षाचालक संतप्त होत आहेत.
Mumbai Live : चारकोपमध्ये गॅस सिलिंडर चोरी; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणमुंबईतील चारकोप परिसरात गॅस सिलिंडर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातची वैद्यकीय तपासणीनाशिक : महिला अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भोंदू अशोक खरातची शुक्रवारी (ता. २७) वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ‘एसआयटी’ विभागाकडून गोपनीयता बाळगत त्यास सकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर करण्यात आले होते. महिला अत्याचार प्रकरणी भोंदू खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. दोनदा त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी कार्यालयीन बाब म्हणून नियमित तपासणीच्या अनुषंगाने तपासी एसआयटी पथकाने त्यास जिल्हा रुग्णालयात नेले होते. पंधरा मिनिटे त्याची तपासणी होऊन त्यास पुन्हा ‘एसआयटी’ कार्यालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याची नियमित आवश्यक ती सर्व प्रकारची तपासणी केली. त्यानंतर लगेचच पुन्हा त्यास घेऊन पथक माघारी परतले. रुग्णालय आवारात असलेल्या नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी त्यास पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.
Sangli : बाळूमामांच्या मेंढरांनी बागडेबाबांच्या पालखीभोवती घातले रिंगणसांगलीच्या गोंधळेवाडी येथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला. पंढरपूरकडे मार्गस्थ होताना संत बाळूमामांच्या मेंढरांनी संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हा मेंढरांचा रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही चैत्रवारी पायी दिंडी पंढपूरकडे निघाली आहे.
Kokan Hapus : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखलसावंतवाडी बाजारपेठेत या हंगामातील हापूस व पायरी आंबा दाखल झाला आहे. मात्र, आंब्याचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. हापूस आंब्याचे दर तब्बल सोळाशे ते अडीच हजार रुपये डझन इतके झाले आहेत. तर, काही ठिकाणी हापूस अडीच हजारांपासून थेट साडेतीन हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे चित्र आहे. पायरी आंब्याचे दर देखील कमी नाहीत. पायरी आंबा ९०० ते १६०० रुपये डझनाने विक्री होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आंबा खरेदी करणे मुश्किल बनले आहे.
Solapur Rain : सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखासोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला आहे. द्राक्ष बागा, बेदाणे, पेरू, आंबा, मका ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटमुळे 7 एकरावरील काढणीला आलेली द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
Kolhapur Live : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघडकोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथे असलेल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दोन नर्स आणि चार एजंटना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मृत गर्भाची विल्हेवाट लावण्याचे काम करणारी अक्काताई कांबळे ही आरोपी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे.
Mahabaleshwar Panchayat Samiti Sabha : महाबळेश्वर पंचायत समितीची सभा खेळीमेळीत; प्रशासकानंतर सदस्यांची पहिलीच बैठकमहाबळेश्वर : येथील पंचायत समितीची सर्वसाधारण सभा प्रशासक कालावधीनंतर प्रथमच लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. पहिलीच बैठक असल्याने विकासकामे, पाणीटंचाई, रिक्त पदे, तसेच प्रलंबित कामांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा (कै.) एम. आर. भिलारे सभागृहात सभापती शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेला उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय विठ्ठल शेलार, वंदना प्रवीण भिलारे, सचिव तथा गटविकास अधिकारी विजय विभूते यांच्यासह सर्व खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Raigad News : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणाररायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिसूचना जारी केली आहे. पुणे जिल्हा हद्दीतील हिरडोशी परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात असल्याने भोर घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंध घाट रस्ता बंद राहणार आहे.
Electricity Tariff Reduction : वीज दर कपातीचा ग्राहकांना दिलासा; पुढील चार वर्षांत सरासरी नऊ टक्क्यांपर्यंत घट शक्यमुंबई : राज्यभरातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. महावितरणच्या बहुवार्षिक वीजदर निश्चितीबाबतच्या पुनर्विचार याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) अंतिम आदेश काढले आहेत. सर्वच गटांतील घरगुती वीज ग्राहकांकडून वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दरात सुरुवातीला किरकोळ कपात होणार असली तरी २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने सरासरी नऊ टक्क्यांची दरकपात होणार आहे.
Karad News : कऱ्हाडात बारा तासांची सिग्नल यंत्रणा; अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रायाेगिक पाऊलकऱ्हाड : शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून, अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचा विचार करून आता शहरातील मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सकाळी आठ ते रात्री आठ असे सलग १२ तास सुरू ठेवण्याचा प्रायाेगिक तत्त्वावर निर्णय झाला आहे. त्यास आजपासून सुरुवातही झाली. शहरातील अपघातांची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दररोज शहरातील विविध भागांत छोटे-मोठे अपघात घडत असून, जखमींची संख्या वाढत आहे. त्याचा विचार करून आता शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील चौकातील सिग्नल आता सकाळी आठ ते रात्री आठ असे १२ तास सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. आजपासून त्यास सुरुवातही झाली. सध्या काही सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्व सिग्नल सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू राहतील.
Bandra Exit Toll Plaza : वांद्रे एक्झिट टोल नाक्यावर वादातून कारचालकाला मारहाणवांद्रे-वरळी सी लिंकच्या वांद्रे एक्झिट टोल नाक्यावर वादातून कारचालकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली. टोल कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर कारचालकाला कथितपणे मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे टोल नाक्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे दहा मिनिटांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणातील अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
Rupali Chakankar Resigns : ..अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाLatest Marathi Live Updates 28 March 2026 : अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचं चाकणकरांनी म्हटलंय. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.