RCB vs SRH Toss : कॅप्टन इशानच्या विरोधात नाणेफेकीचा कौल, आरसीबीचा फिल्डिंगचा निर्णय, विराट खेळणार की नाही?
Tv9 Marathi March 28, 2026 11:45 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात टॉस कोण जिंकणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 2008 नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या हंगामातील सलामीचा सामना होत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गतविजेत्या आरसीबीच्या बाजूने नाणेफेकाचा कौल लागला आहे. कर्णधार रजत पाटीदार याने चेसिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता हैदराबादचे राक्षशी बॅटिंग करणारे फलंदाज किती धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

बंगळुरुत कोण देणार विजयी सलामी? आकडे काय सांगतात?

सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपैकी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कोणता संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे. विजयाबाबत या मैदानात 2024 पासूनची आकडेवारी ही 50-50 अशी आहे.

या मैदानात 2024 पासून आयपीएल स्पर्धेतील एकूण 12 सामने झाले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघांचा विजय झाला आहे. तर तितक्याच अर्थात 6 सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

आरसीबीची प्लेइंग ईलेव्हन: विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी आणि सुयश शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार आणि विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि एशान मलिंगा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.