Kolhapur : कोल्हापूरच्या कोर्टात महिलेला मारहाण; १५ वकिलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
Saam TV March 29, 2026 01:45 AM

रणजीत माजगावकर

Kolhapur court incident : कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी तब्बल १५ वकिलांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur court woman assault atrocity case 15 lawyers details)

ही घटना ७ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायालयाच्या तळमजल्यावरील झेरॉक्स सेंटर परिसरात घडली. अश्विनी उर्फ पल्लवी निखिल पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी अश्विनी पाटील यांनी पतीविरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला असून, सुनावणीसाठी त्या कोर्टात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पतीकडेकाही घरगुती साहित्याची मागणी केली. त्यातून वाद निर्माण झाला.

Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर वृद्ध चालकाच्या कारचा थरार; तरुणीचा जागीच मृत्यू, ४ जखमी

फिर्यादीनुसार, अॅड. काजल शेळके यांनी अश्विनी पाटील यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गालातून रक्तस्राव झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित इतर वकिलांनीही अश्विनीयांना धमकावत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच तिला बाहेर काढण्याचा आणि तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Navi mumbai : कथित छापेमारी ते १०-१५ कोटींसाठी प्रेशर; बिल्डर आत्महत्या प्रकरणात मुंबई, नवी मुंबईतील बड्या अधिकाऱ्यांची नावे

या प्रकरणी अॅड. काजल शेळके, अॅड. मनिषा सातपुते, अॅड. साक्षी निकम, अॅड. हर्षा खंडेलवाल, अॅड. संदीप चौगुले, अॅड. व्ही.आर. पाटील, अॅड. संदीप देशपांडे, अॅड. नारायण भांदिगरे, अॅड. विवेक घाटगे, अॅड. सुरज भोसले, अॅड. स्वाती तानवडे, अॅड. तृप्ती किनरे, अॅड. विद्या देशमुख, अॅड. जे.जे. देसाई आणि अॅड. शिल्पा सुतार यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत असून, न्यायालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पेट्रोल निर्यातीवर रशियाची बंदी, १ एप्रिलपासून भारतावर काय होणार परिणाम? सोप्या शब्दात घ्या समजून
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.