Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Cricket News : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या सामन्यात बरेच कलाटणी देणारे क्षण ठरले... न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफी याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच स्पेलमध्ये तीन विकेट्स घेतल्या.. पण, त्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन ( Ishan Kishan) व हेनरिच क्लासन यांच्या ९७ धावांच्या भागीदारीने SRH ला सामन्यात पुनरागमन करून दिले. पण, फिल सॉल्टच्या ( Phil Salt) दोन अविश्वसनीय झेलने सामन्याला पुन्हा कलाटणी दिली. इशानला शतकापासून वंचित रहावे लागले.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीला आलेल्या RCB ला डफीने २९ धावांत ३ यश मिळवून दिले. अभिषेक शर्मा ( ७), ट्रॅव्हिस हेड ( ११ ) व नितीश कुमार रेड्डी ( १) हे अपयशी ठरले. पण, इशान व क्लासन जोडी मैदनावर उभी राहिली आणि त्यांनी ५३ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. क्लासेनचा ( ३२) सीमारेषेवर सॉल्टने टिपलेला झेल चर्चेला कारण ठरला. त्याने सीमारेषेनजिक झेल टिपला आणि तिसऱ्या अम्पायरच्या OUT निर्णयावर क्लासन नाराज दिसला. त्यानंतर इशानचाही सॉल्टने एका हाताने हवेत झेपावत झेल टिपला.
RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?१६व्या षटकात अभिनंदन सिंगच्या फूलटॉसवर इशानने डीप बॅकवर्डच्या दिशेने चेंडू टोलवला. पण, सॉल्ट पळत येऊन एका हाताने झेल टिपला. इशानला ३८ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांवर माघारी जावे लागले. आयपीएलमध्ये कर्धणार म्हणून पहिल्याच सामन्यातील ही सहावी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. संजू सॅमसन ११९ ( वि. पंजाब किंग्स, २०२१) धावांसह अव्वल क्रमांकावर आहे.
Highest scores on IPL captaincy debut119 - संजू सॅमसन (RR) विरुद्ध PBKS, 2021
99* - मयंक अग्रवाल (PBKS) विरुद्ध DC, 2021
93* - श्रेयस अय्यर (DC) विरुद्ध KKR, 2018
88 - फॅफ डू प्लेसिस (RCB) विरुद्ध PBKS, 2022
83 - किरॉन पोलार्ड (MI) विरुद्ध PBKS, 2019
80 - ईशान किशन (SRH) विरुद्ध RCB, 2026*
सलिल अरोरा ( ९) व हर्ष दुबे ( ३) हे अपयशी ठरले. अनिकेत वर्माचा ( २६) विराटने सोपा झेल टाकला. अनिकेतने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांची वादळी खेळी केली. हैदराबादने ९ बाद २०१ धावा करून बंगळुरूसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या केल्या.