संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिका आणि इराणमधील युद्धाकडे लागले आहे. या युद्धाच्या काळात अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये लोक अली खामेनी यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड पाठिंबा दिला होता. हे आंदोलन पेटवून इराणमध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांचा होता, मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. अशातच आता टम्प यांनी खामेनी यांच्यासोबत जे केलं तेच आता त्यांच्यासोबत होताना दिसत आहे. कारण संपूर्ण अमेरिकेत लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, लाखो लोक अमेरिकेच्या रस्त्यांवर उतरले आहेत. रस्त्यावर नो किंग्स अशा घोषणा दिल्या जात आहेत. 90 लाखांहून अधिक लोक आंदोलनात उतरल्याचा दावा केला जात आहे. या लोकांना राजा नव्हे तर राष्ट्राध्यक्ष हवा आहे. ट्रम्प यांच्या कामकाजाच्या पद्धतीला लोक हुकूमशाही असे म्हणत आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तक्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर बोलले जात आहे. देशभरात 3100 पेक्षा अधिक ठिकाणी आंदोलने झाल्याचे समोर आले आहे. लोकांचा आरोप आहे की ट्रम्प यांनी देशाला युद्धाच्या दिशेने ढकलले असून ते आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील या आंदोलनाला नो किंग्स असे नाव देण्यात आले. याचे कारण म्हणजे आंदोलक म्हणत आहेत की, डोनाल्ड ट्रम्प आता राष्ट्राध्यक्षासारखे नव्हे, तर जुन्या काळातील राजासारखे वागत आहेत. युद्धावर मोठ्या प्रमाणात खर्च करणे आणि विरोधकांचा आवाज दडपणे यामुळे लोकांना त्या इराणी व्यवस्थेची आठवण येत आहे. अशाप्रकारच्या व्यवस्थेवर अमेरिका नेहमी टीका करत आली आहे. आता ट्रम्प यांनाच अशाप्रकारच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
नो किंग्स या आंदोलनाचे प्रमुख केंद्र सेंट पॉल हे शहर आहे. या ठिकाणी 1.5 लाखांहून अधिक लोक एकत्र जमले होते. कारण याच ठिकाणी फेडरल एजंटांनी इमिग्रेशन कायदा अंमलात आणताना दोन लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे लोकांच्या मनात राग होता. ब्रूस स्प्रिंगस्टीन आणि इतर काही प्रसिद्ध कलाकारांनाही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.