ट्रम्प यांच्या 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प'च्या दाव्यावरून वाद, खरंच 'होर्मुझ सामुद्रधुनी'चं नाव बदलता येतं का?
esakal March 29, 2026 02:45 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दाव्यांमुळे सातत्याने चर्चेत येतात. शुक्रवारी त्यांनी इराणसोबत युद्धाबाबत बोलताना म्हटलं की, शस्त्रसंधीसाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी तेलवाहतुकीला खुली केली पाहिजे. ट्रम्प यांनी या महत्त्वाच्या जलमार्गाला स्वत:चं नाव देत स्ट्रेट ऑफ ट्रम्प म्हटलं.

ट्रम्प यांनी एखाद्या ठिकाणाला त्यांचं नाव देण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. याआधी त्यांनी वॉशिंग्टनमधील अनेक ठिकाणांना स्वत:चं नाव दिलं होतं. ट्रम्प यांनी त्यांच्या टिप्पणीवर ही एक चूक होती म्हटलं पण लगेच पुढे म्हणाले की, माझ्यासोबत काही चुकीचं होत नाही. अर्थात ट्रम्प यांनी उपरोधिक दावा केला असला तरी त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. कोणताही नेता किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही आंतरराष्ट्रीय जलमार्गाचं नाव बदलू शकतात का? नसेल तर त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? असे प्रश्न उपस्थित होतायत.

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार? नाव बदलता येतं का?

होर्मुजची सामुद्रधुनी यासारखे आंतरराष्ट्रीय जलमार्ग संयुक्त राष्ट्राच्या कन्वेंशन ऑन द लॉ ऑफ सीसारख्या जागतिक ररारानुसार चालतात. त्यामुळे एका देशाला किंवा नेत्याला त्याचे नाव बदलण्याचा अधिकार नाहीय. असे मार्ग, ठिकाणे किंवा वास्तूंची नावे जगभरात बऱ्याच काळापासून वापरण्यात येणाऱ्या नकाशे, आंतरराष्ट्रीय करार, दिशा दर्शक यंत्रणा, व्यापारात मान्यतेच्या आधारे ठरवण्यात येतात. सर्व देशांच्या संमतीनेच हे ठरवलं जातं. त्यामुळे कायद्यानुसार स्ट्रेट ऑफ ट्रम्प असं नाव बदलता येत नाही.

एखाद्या वास्तूचं, ठिकाणाचं नाव बदलण्याचं उपरोधाने, मिश्किलपणे टिप्पणी करणं गंमतीने घेण्याची गोष्ट असली तरी ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर मालकी सांगण्यासारखा प्रकार आहे. एक इशारा म्हणूनही याकडे पाहिलं जाऊ शकतं. होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची असल्यानं ट्रम्प यांचं विधान गंमतीने घेण्यासारखं नाहीय.

ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा असे दावे केले आहेत ज्यावर ते खरे की खोटे असे वाद झालेत. आता होर्मुझबाबत केलेल्या विधानातून ट्रम्प यांना जागतिक समुद्र जलमार्गापैकी महत्त्वाच्या अशा सामुद्रधुनीवर आपला दबदबा असावा यासाठी त्यांच्या हालचाली असल्याचे संकेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.