आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चौथ्या सामन्यात गतउपविजेता पंजाब किंग्स विरुद्ध 2022 मधील चॅम्पियन टीम गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या पर्वातील पहिलाच सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे कोणता संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी?
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मंगळवारी 31 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना न्यू चंडीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.