सीआरपीएफ मध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगाव च्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला. २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला एका अनोळखी गाडीने जोरदार धडक दिली या अपघातात तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली
सोलापूरमध्ये अवकाळी पवासाचा तडाखादक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
अवकाळी पावसासोबत सुरु असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंद्रूप गावातील डीपीला लागली आग
मंद्रूप गावातील डीपी जळाल्यामुळे रात्रभर वीजपुरवठा होता खंडित
त्यामुळे मंद्रूप गावातील गावाकऱ्यांना रात्र काढावी लागली अंधारात..
मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आमदार सुरेश शेळके यांनी केला संताप व्यक्त..मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आमदार सुनिल शेळके यांनी संताप व्यक्त करत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक वडगाव येथे घेण्यात आली होती. या बैठकीत महसूल विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार शेळके यांनी विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेत असताना अनेक त्रुटीं निदर्शनास आल्या. दरम्यान नागरिकांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच, कामात होत असलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना तत्पर आणि पारदर्शक सेवा द्यावी, असे निर्देश दिले. कामात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला...