लागली मोठी वाट, थेट डोनाल्ड ट्रम्प युद्धासाठी या देशांकडे मागणार पैसे, उडाली झोप..
Tv9 Marathi March 31, 2026 11:45 AM

अमेरिका आणि इराण युद्धाला 1 महिना पूर्ण झाला. युद्धात फक्त इस्त्रायल आणि इराणचेच नुकसान झाले नाही. या युद्धात थेट इस्त्रायलच्या बाजूने उतरलेल्या अमेरिकेचेही मोठे नुकसान होत आहे. इराण या युद्धात हार मानत नाहीये. मात्र, इराणसोबत लढताना अमेरिकेचे बारा वाजले आहेत. जगातील जवळपास सर्वच देश अमेरिकेच्या विरोधात आहेत. शिवाय युद्ध लढताना त्यांना आर्थिक चणचण देखील भासत आहे. दुसरीकडे इराणसोबत युद्ध सुरू केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठ्या संख्येने अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरले. दुसरीकडे इस्त्रायलच्या लोकांनी रस्त्यावर उतरून युद्धाला विरोध करत युद्ध थांबवण्याची मागणी केली. इराण आणि अमेरिका युद्ध घातक स्थितीत पोहोचले आहे. 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही बॉम्ब हल्ले केले जात आहेत. युद्ध लवकरच थांबण्याचे अमेरिकेकडून संकेत मिळत आहेत. युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या. त्यामधील सर्वात महत्वाची आणि मोठी अट अशी आहे की, युद्धात झालेल्या नुकसानीची सर्व भरपाई हवी.

आता इराणसोबत युद्ध लढत असताना डोनाल्ड ट्रम्प यांना भिकेला लागण्याची वेळ आली. एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून युद्ध सुरू आहे. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जबरदस्त प्लॅन तयार करण्यात आला. त्यामध्ये इराण आता थेट इतर देशांकडे पैशांची मागणी करण्याच्या तयारीत आहेत. थेट अमेरिका अरब देशांकडे पैसा मागणार आहे.

व्हाईट हाऊसच्या सचिव कॅरोलनी लेविट यांनी संकेत दिले की, अरब देशांकडून त्यांची मोठी मागणी असणार आहे. लेविट यांना विचारण्यात आले की, अरब देश या युद्धात खर्च करण्यासाठी मदत करतील का? यावर बोलताना त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यावर काही पहिले बोलणार नाहीत, पण डोनाल्ड ट्रम्प याचा विचार करू शकतात. पुढे त्यांनी म्हटले, डोनाल्ड ट्रम्प असे करण्यास खूप जास्त इच्छुक आहेत.

हा असा विचार आहे, ज्याबद्दल मला त्यांच्या मनात काय सुरू आहे, हे माहिती आहे. मला वाटते की, लवकरच डोनाल्ड ट्रम्प हे करतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला मोठा इशारा देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणने जर शांतता करार केला नाही तर अमेरिका त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.