रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल, येत्या 1 एप्रिलपासून…माहिती नसल्यास थेट खिसा होणार रिकामा!
Tv9 Marathi March 31, 2026 08:45 PM

Railway Rule Change : येत्या 1 एप्रिल रोजीपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. आता नव्या आर्थिक वर्षासोबत अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियमांचा नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम पडणार आहे. येत्या 1 एप्रिल रोजीपासून रेल्वे विभागातही अनेक नियम बदलणार आहेत. याच बदलणाऱ्या नियमांपैकीतिकीट कॅन्सलेशनचा नियम खूप महत्त्वाचा आहे. कारण हा नियम तुम्हाला माहिती नसल्यास तुमच्या खिशाला मोठी झळ बसू शकते. त्यामुळेच हा नियम नेमका काय आहे? ते समजून गेऊ या..

तिकीट कॅन्सलेशनच्या नियमात नेमका बदल काय?

येत्या 1 एप्रिल 2026 रोजीपासून रेल्वे तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंडच्या धोरणात महत्त्वाचा बदल झाला आहे. आता रेल्वेने आपला प्रवास सुरू करण्याच्या (डिपार्चर) 8 तास अगोदर प्रवाशांना तिकीट कॅन्सलेशन करावे लागणार आहे. 8 तासांनंतर तुम्ही तुमचे तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक रुपयाही रिफंड मिळणार नाही. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी जरी तिकीट बुक केलेले असले तरी या नियमाचे पालन न केल्यास तुम्हाला एक रुपयाही रिफंड मिळणार नाही.

अन्य कोणकोणते नियम बदलले?

याआधी रेल्वेचा प्रवास सुरू होण्याच्या 4 तास अगोदर जरी तुम्ही तिकीट कॅन्सल केलं तरी तुम्हाला तुमचे तिकिटाचे पैसे रिफंड मिळायचे. आता मात्र तुम्हाला तुमचे पैसे रिफंड हवे असतील तर 8 तासांच्या अगोदर तिकीट कॅन्सल करावे लागणार आहे. तुम्ही ट्रेनचा प्रवास सुरू होण्याच्या 8 ते 24 तास अगोदर तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला 50 टक्के रिफंड मिळेल. 24 ते 72 तास अगोदर तिकीट कॅन्सल केले तर 75 टक्के रिफंड मिळेल. तसेच 72 तासांच्या अगोदर तुम्ही तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला तुमचे सर्व पैसे परत मिळतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.