गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, तीन पुरुष सहा महिलांचा समावेश 
मंगेश भांडेकर March 31, 2026 10:13 PM

Gadchiroli : गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 'नक्षलमुक्त भारत'साठी 31 मार्चची डेडलाईन होती. आज डेडलाईनच्या शेवटच्या दिवशी 9 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नवही नक्षलवाद्यांवर 30 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये तीन पुरुष सहा महिलांचा समावेश आहे. दोन एरिया कमिटी मेंबर तर 7 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. 
नवही जणांचा छत्तीसगड मधील इंद्रावती नॅशनल पार्क मध्ये वावर होता.  

आत्मसमर्पण केलेले नवही नक्षलवादी छत्तीसगडमधील रहिवाशी

आज आत्मसमर्पण केलेले नवही नक्षलवादी छत्तीसगडमधील रहिवाशी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ते सहा नक्षलवादी अद्यापही चळवळीत आहेत. 31 मार्चची हेडलाईन संपूनही गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत रेकॉर्डवर असलेले सहा नक्षलवादी अद्यापही सक्रिय आहेत. त्यांनी आत्मसमर्पण केले नाही. 

गेल्या आठवड्यातच छत्तीसगडमध्ये  55 लाख रुपयांचे बक्षीस असणाऱ्या माओवाद्याच आत्मसमर्पण

गेल्या आठवड्यातच छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आज पापा राव या वरिष्ठ माओवादी कमांडरच्या आत्मसमर्पणाच्या दिवशीच भारतीय सुरक्षा दलाला दुसरा मोठं यश ओडिशामधून मिळालं आहे. माओवाद्यांच्या ओडिशा राज्य समितीचा प्रमुख सुकरु उर्फ कोशा सोढी या 49 वर्षीय माओवादी कमांडर ने ओडिशा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यासोबत इतर चार पुरुष माओवाद्यांनीही आपले शस्त्र खाली ठेवले आहे. त्यामुळं सुरक्षा दलांना आज दोन मोठी यश मिळाले आहे. 

सुकरुवर 55 लाख रुपयांचे बक्षीस होते

सुकरु उर्फ कोशा सोढी ओडिशा मधील मोस्ट वॉन्टेड माओवादी कमांडर होता. 31 वर्षांपासून सशस्त्र माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या सुकरुवर 55 लाख रुपयांचे बक्षीस होते. विशेष म्हणजे आज आत्मसमर्पण करणाऱ्या सुकरु ने काही दिवसांपूर्वी ओडीसा मधील माओवाद्यांचा मिलिटरी प्रमुख अन्वेष उर्फ रेणू या 31 वर्षीय माओवादी कमांडरशी फक्त यामुळे हत्या केली होती, कारण तो आत्मसमर्पण करण्यासाठी सर्वांना तयार करत होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत आत्मसमर्पणाच्या मुद्द्यावरुन आपल्या सहकाऱ्यांची हत्या करणाऱ्या सुकरु ने आज मात्र स्वतः आपले शस्त्र पोलिसांसमोर ठेवले.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.