पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथे महावीर जयंती निमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर जयंती निमित्त प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती.
येथील श्री श्रेयांसनाथ जैन मंदिर मधे श्री वर्धमान भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंदिरात पूजा अभिषेक करून सकाळी भगवान महावीर स्वामी पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर प. पू. आचार्य विश्वकल्याण विजयजी महाराज यांचे भगवान महावीर स्वामी वर प्रवचन झाले.
सायंकाळी आरती व भक्ती संध्या चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.