IPL 2026, GT vs PBKS : नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, गोलंदाजी निवडत कर्णधार अय्यर म्हणाला..
GH News March 31, 2026 10:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. हा ट्रेंड चौथ्या सामन्यातही कायम राहिला. आता हा सामना कोण जिंकतं याबाबतची उत्सुकता मात्र असणार आहे. कारण आतापर्यंतच्या तीन सामन्यात नाणेफेकीसोबत सामनाही जिंकला आहे. आता हा ट्रेंड मोडण्याचं आव्हान गुजरात टायटन्ससमोर असणार आहे.  पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आमचा मागचा हंगाम जबरदस्त होता. आम्हाला वर्तमानात राहायचे आहे. आम्हाला भूतकाळाचा विचार करण्याची गरज नाही. आम्हाला आमच्या सर्वोत्तम शैलीतील क्रिकेट खेळण्याची गरज आहे. कूपर संघात आला आहे. स्टॉयनिस, बार्टलेट आणि मार्को जॅनसेन संघात आहेत.’

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘खेळपट्टी बरीच चांगली दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. फलंदाजीसाठी ही एक चांगली खेळपट्टी दिसते आहे. गेल्या वर्षी आमचा हंगाम खूप चांगला गेला होता. ग्लेन आणि अशोक शर्मा या दोघांनी पदार्पण केले. आमच्याकडे जोस, ग्लेन, रशीद आणि रबाडा आहेत. बटलर इतका अनुभवी खेळाडू आहे, मला खात्री आहे की तो आमच्यासाठी हे वर्ष खूप चांगले घालवेल.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, एम शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज.

दोन्ही संघाचे इम्पॅक्ट प्लेयर

गुजरात टायटन्स: प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर, जयंत यादव, मानव सुथार, कुमार कुशाग्र.

पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, सूर्यांश शेडगे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.