नाशिक : धार्मिक विधीच्या आडून महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत सात दिवसांची कोठडी दिली असून, यामुळे आधी कारागृहात रवानगी झालेल्या खरातची (Ashok Kharat) दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या या प्रकरणानुसार, २०२० ते २०२६ या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात पीडितेला बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीने भविष्याबाबत भीती निर्माण करत तिला आपल्या जाळ्यात ओढले. ‘मंत्र केलेले पाणी’ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकारातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने औषधे देत गर्भपात घडवून आणल्याचाही गंभीर आरोप आहे. विरोध केल्यास कुटुंबावर अनिष्ट परिणाम होतील, अशी धमकी देऊन तिला गप्प ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.(Ashok Kharat)
दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 22 रुद्राक्षांचा डबा, अंक व इंग्रजी अक्षरे असलेली पट्टी, काळ्या रंगाचे भिंग आणि हिरवट द्रव असलेली बाटली यांचा समावेश आहे. या वस्तूंचा वापर कथित अघोरी कृत्यांसाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, पीडितेकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार करण्यात आले का, याचाही तपास सुरू आहे.(Ashok Kharat) विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी चौकशी करत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसआयटीच्या तपासात अशोक खरातकडून (Ashok Kharat) होत असलेल्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत असून त्यामुळे अधिकारी देखील चक्रावले आहेत. मिरगाव (ता. सिन्नर) येथील एका कुटुंबाची १६ लाखांची जमीन अत्यंत कमी किमतीमध्ये घेण्यासाठी खरातने संबंधित कुटुंबाकडे तगादा लावला होता. अशोक खरातने (Ashok Kharat) कुटुंबाला भीती घातली, तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात कुटुंबात वाईट पटना पडेल, अशी भीती घातली. याच दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू देखील झाला. याचा गैरफायदा घेत खरातने, जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती दाखवत त्याला हवी असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करून घेतली. याच जमिनीवर अशोक खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे.(Ashok Kharat)
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) फरार असल्याने आता एसआयटीकडून खरात नातलगांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यांची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. तसेच कल्पना खरातच्या दोन भावांचीही तपास पथकाने चौकशी करण्यात आली. कल्पना खरात फरार असून एसआयटीचे पथक कल्पना खरातच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी देखील कल्पना खरात अद्याप मिळून न आल्याने कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस काढण्यात आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)