Why Christians Observe But Don’t Celebrate Good Friday: दरवर्षी ईस्टर संडेच्या दोन दिवस आधी येणारा गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्वाचा आणि दुःख व्यक्त करणारा दिवस आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी क्रॉसवर दिलेल्या बलिदानाची आठवण केली जाते.
2026 मध्ये हा दिवस ३ एप्रिलला आला आहे. इस्टरच्या आधीचा हा दिवस असून, इस्टरला येशू पुन्हा जिवंत झाल्याचा आनंद साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील ख्रिश्चन लोक प्रार्थना करून येशूच्या दुःख आणि त्यागाचा विचार करतात.
गुड फ्रायडेची तारीख(Date of Good Friday)
गुड फ्रायडेची तारीख दरवर्षी ईस्टरच्या तारखेवर अवलंबून असते. ती ईस्टर हा वसंत ऋतूनंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 2026 मध्ये ईस्टर 5 एप्रिल रोजी आहे, त्यामुळे गुड फ्रायडे आज 3 एप्रिल 2025 रोजी आहे.
गुड फ्रायडचा इतिहास(History of Good Friday)
गुड फ्रायडचा इतिहास सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा जेरुसलेममध्ये येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आलं. ख्रिश्चन धर्मीयांच्या मते, येशू ख्रिस्तांना अटक झाली होती, त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि रोमन सत्ताधाऱ्यांनी त्यांना मृत्यूदंड दिला. हा दिवस येशूंच्या मोठ्या त्यागाची आठवण करून देतो. असं मानलं जातं की त्यांच्या बलिदानामुळे लोकांच्या पापांना माफी मिळाली. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस लोक उपवास, प्रार्थना आणि शांतपणे स्मरण करून पाळतात.
गुड फ्रायडचं महत्त्व(Importance of Good Friday)
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन लोकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांनी दाखवलेलं प्रेम, साधेपणा आणि लोकांसाठी सहन केलेलं दुःख याची आठवण केली जाते. क्रॉसवर चढण्याची घटना त्यांच्या धर्मात खूप मोठी मानली जाते, कारण त्यातून मोक्ष आणि नवीन जीवनाचा मार्ग मिळाला असं मानलं जातं. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना, प्रवचन आणि येशूच्या शेवटच्या दिवसांची आठवण करून देणारे कार्यक्रम घेतले जातात.
ख्रिश्चन लोकांसाठी हा दिवस फक्त एक ऐतिहासिक आठवण नाहीये, तर स्वतःबद्दल विचार करण्याचा आणि आपल्या चुका मान्य करून सुधारण्याचा दिवस आहे. या दिवशी लोक मन शांत ठेवून प्रार्थना करतात आणि आयुष्यात चांगले बदल करण्याचा प्रयत्न करतात. त्याग, दया आणि माफ करण्याची भावना यांना या दिवशी खास महत्त्व दिलं जातं.
शोकाचा दिवस मह 'गुड' का?गुड फ्रायडेला ‘गुड’ असं म्हणतात, कारण येशूच्या मृत्यूनंतर ते पुन्हा जिवंत झाले. त्यामुळे आशा, मोक्ष आणि मृत्यूवर विजय मिळाल्याचा संदेश मिळतो.
गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो?(How is Good Friday celebrated?)
गुड फ्रायडे साजरा करण्याच्या पद्धती जगभर वेगवेगळ्या आहेत.
चर्च सेवा:अनेक चर्चमध्ये खास प्रार्थना, प्रवचन आणि ध्यानधारणा केली जाते.
स्टेशन्स ऑफ द क्रॉस: काही ख्रिश्चन लोक येशूंच्या शेवटच्या क्षणांचे अनुकरण करून ते धार्मिक विधी म्हणून पार पाडतात.
उपवास आणि ध्यान: काही जण विशिष्ट खाण्या-पिण्याच्या पदार्थांचा त्याग करून उपवास करतात किंवा काही आनंददायी गोष्टींपासून दूर राहतात.
धार्मिक यात्रा: काही ठिकाणी येशूंच्या कॅल्व्हरीकडे जाणाऱ्या प्रवासाचं प्रतीक म्हणून धार्मिक मिरवणुका किंवा यात्रांचं आयोजन केलं जातं.
यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युरोपमधील अनेक देशात गुड फ्रायडे सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी शाळा, दफ्तर किंवा सरकारी कार्यालये बंद राहतात.