Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय
esakal April 03, 2026 04:45 PM
Mumbai Live: मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे हजार कोटी रुपयांच्या टेंडर्स रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या प्रक्रियेतून मंजूर झालेल्या या टेंडर्सबाबत पारदर्शकतेचे आणि नियमांचे प्रश्न उपस्थित झाल्याने प्रशासनाने त्यांना स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे विविध विकासकामांवर तात्पुरता परिणाम होणार असला तरी, नव्याने आणि अधिक पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Live छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस माफियांवर मोठी कारवाई, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्या गॅस माफियांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून राज्यस्तरीय दक्षता पथकाने गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात मोठी कारवाई करत आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत एक कोटी सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल आणि दोन मोठे टँकर जप्त करण्यात आले असून तब्बल दोन हजार चारशे ऐंशी गरीब कुटुंबांच्या हक्काचा गॅस चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. राज्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक भूमिका घेत संबंधित यंत्रणांनी शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत ही धडक कारवाई केली आहे.

Nashik Live: भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर अंनिस आक्रमक

नाशिक -

- नाशिकमध्ये अंनिसच्या राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेला सुरुवात

- संघर्ष परिषदेला राज्यभरातून ३०० हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती

- राज्यात भोंदू बुवांच्या प्रकरणांमुळे बुवाबाजीचे भीषण वास्तव समोर

- बुवाबाजीच्या माध्यमातून आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाचे रॅकेट उघड झाल्यानं अंनिसच्या संघर्ष परिषदेत महत्वाचे ठराव

- अंनिसकडून गेल्या ३६ वर्षांत हजारो भोंदूंचा पर्दाफाश

- जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईला वेग येण्यासाठी परिषदेत अंधश्रद्धाविरोधी संकल्प

- राज्यासह केंद्र सरकारकडे अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि कडक कायदे करण्याची मागणी करणार

Pune Live: जुन्नरमध्ये मुसळधार पाऊस व गारपिटीचा तडाखा; विटभट्टी व्यवसायाला मोठा फटका

जुन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसासह गारपिटीमुळे शेतीपूरक व्यवसायांवर मोठं संकट ओढवलं आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या विटांचा मोठा साठा पावसामुळे खराब झाला असून, विटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.

Nandurbar Live: नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे झाड उलमडून पडली

नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे झाड उलमडून पडली....

अचानक आलेल्या वादळी वारामुळे कार वर कोसळल भलं मोठं झाड....

कारवर झाड आदळल्याने कार चकणाचुर.....

नंदुरबार शहरातील शहाबाई नगर परिसरातील घटना....

झाड कोसळण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद....

Pune Live: पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ठाकरे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती

जितेंद्र बडेकर,हवेली(समाज कल्याण )

अमोल नलावडे,वेल्हे(बांधकाम व आरोग्य)

दीपाली हुलावळे मावळ,(कृषी सभापती)

पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नव्या सभापतींचा कार्यकाळ हा फक्त सव्वा वर्षाचा असणार आहे.

सभापती पद देतानाच नवीन सभापतींना त्यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळाची पूर्वसूचना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीय.

निवड झालेल्या नवीन सभापतींचा कार्यकाळ २ जुलै २०२७ पर्यंतच असणार आहे..

Nandurbar: नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nandurbar: नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नंदुरबार तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी...

ऐन काढणीच्या टप्प्यातील पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला..

पूर्व भागानंतर आता पश्चिम भागातही वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटका..

चार दिवसांपूर्वीच्या अवकाळी पावसातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..

टोकरतलाव शिवारातील राठोड यांच्या दोन एकरांवरील मका पीक पूर्णपणे आडवे...

नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात वीज पडून एका बैलाचा मृत्यू...

अवकाळी पावसामुळे नांदरखेडा, आष्टी आणि टोकर तलाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Ratnagiri: साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Ratnagiri: साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी- साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील घटना

पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती खासगी बस

बस मधील ३० प्रवाशी सुखरूप बाहेर पडले, बसने अचानक पेट घेतल्याने प्रवासी घाबरले

अग्निशमन दलाच्या गाडीला आग विझवण्यात यश

चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र या बाजारपेठेमध्ये भाजीपाला पडूनच आहे कारण नवी मुंबईमध्ये , मुंबईमध्ये हॉटेलमध्ये गॅस पुरवठा मिळत नसल्यामुळे त्यामुळे हॉटेल व्यवसायिक इथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडूनच आहे याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे.

Bihar Live : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

एलपीज संकटाने स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यास भाग पाडले आहे. गुजरातच्या सुरत शहरातून आपल्या मूळ गावी परतलेल्या रोजंदारीवरील मजुरांनी आपल्या हालअपेष्टांच्या कहाण्या मांडल्या आहेत.

Indian Navy Live : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

स्टेल्थ-गाईडेड क्षेपणास्त्र फ्रिगेट 'INS तारागिरी' आज भारतीय नौदलात दाखल होईल.

Nashik News : सातपूर, गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या

नाशिक : सातपूर, गंगापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्याच्या मुसक्या अखेर आवळल्या आहेत. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अट्टल घरफोड्याच्या चौकशीतून दहा घरफोड्यांची उकल झाली असून, सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रदीप जगन्नाथ तुपे (वय ३५, रा. जेकेनवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोड्याचे नाव आहे. शहरातील घरफोड्यांचा समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत होते.

Nashik News : सिंहस्थ कामांच्या पाहणीसाठी मुख्य सचिव नाशिकमध्ये मुक्कामाला

नाशिक : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या पाहणीसाठी शुक्रवार (ता. ३)पासून तीन दिवस नाशिकमध्ये मुक्कामाला येत आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील कामांचा आढावा ते घेतील. अग्रवाल यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Kolhapur News : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

कोल्हापूरमध्ये जोतिबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्तावर काळाने घाला घातला आहे. जोतिबाचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना पंचगंगा नदीच्या पात्रात, शिंगणापूर बंधाऱ्यावर पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अरुण धोंडीराम गुरव (वय ३८, रा. दुर्गमानवाड, ता. राधानगरी) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

Muktainagar Rain : मुक्ताईनगर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; जोरदार गारपिटीने झोडपले

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याला वादळी पावसाने आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Sanjita Mohapatra : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तपदी संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तपदी संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती झाली आहे. सध्या त्या अमरावती येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीचे पत्र आज महापालिकेला प्राप्त झाले. त्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरणार आहेत.

Radhanagari News : शिराळ्यातील तरुणाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू

राधानगरी : पर्यटनासाठी आलेल्या पाच तरुणांपैकी एका तरुणाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काळम्मावाडी येथे घडली. अभिषेक बाबासो कांबळे (वय २१, रा. शिराळा, जि. सांगली) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अभिषेकच्या अकाली मृत्यून शिराळ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री उशिरा त्याच्यावर शिराळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील , बहीण ,आजी, दोन चुलते, चुलती असा परीवार आहे.

Nipani News : निपाणीत वळवाची जोरदार सलामी; तंबाखूसह ज्वारीचे नुकसान

निपाणी : यंदाच्या हंगामातील वळवाने गुरुवारी (ता. २) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दमदार सलामी दिली. या पहिल्या पावसातच सर्वांची धावपळ उडाली. वळीव व वादळी वाऱ्याने येथील केसरकर मळ्यातील दोन घरांचे छत उडाल्याने घरातील तंबाखू, ज्वारी, कडबाकुट्टीचे नुकसान झाले आहे. निपाणीसह यमगर्णी अनेक भागांत झाडे व वीज खांब कोसळले.

Weather Update : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Latest Marathi Live Updates 03 April 2026 : राज्यात मागील तीन दिवसांत विविध ठिकाणी कोसळत असलेल्या पावसाने आजही अनेक जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यांवर पडल्याने आणि सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. पुण्यात एका महिलेचा झाड कोसळून, बीड व सातारा जिल्ह्यांत मिळून दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.