शिर्डी: समता पतसंस्थेचे ग्राहक एक लाख दहा हजार, वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपये आणि कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यामुळे संस्थेत कुणीही खाते उघडून व्यवहार करतो. कॅप्टन अशोक खरात याच्या संबंधित सर्व खाती कायदेविषयक सर्व पूर्तता करून उघडली. त्याद्वारे झालेले व्यवहार देखील नियमांना धरून आहेत. शिर्डी पोलिसांनी त्याबाबत पत्राद्वारे मागितलेली सर्व माहिती अवघ्या दोन तासांत आम्ही त्यांच्या सुपूर्द केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार ही सर्व खाती गोठविण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पत्रकारांना दिली.
Pune Airport News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! चार नव्या शहरांसाठी पुण्याहून उड्डाण; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉटना मंजुरी..कोयटे म्हणाले की, संस्थेच्या ९९ टक्के खातेदारांच्या साठ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेला लिक्विडिटी बेस्ट प्रोटेक्शन स्कीमद्वारे सुरक्षा प्रदान केलेली आहे. सर्व व्यवहार पारदर्शी आहेत. ही देशातील एक अव्वल संस्था आहे. खरात याच्या आर्थिक व्यवहाराबाबत गोपनीयता ठेवा, त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आले आहे. गोपनीयता सांभाळून आम्ही सर्व माहिती माध्यमांसमोर ठेवली.
एक लाख दहा हजार खातेदारांत खरात याची खाती आणि उलाढाल लक्षात कशी येईल. तथापि त्यातील व्यवहार आणि कागदोपत्री पूर्तता नियमांना धरून आहे. मे २०२१ ते जानेवारी २०२६ या काळात व्यवहार झाले. त्याच्या चार खात्यांत आता केवळ तीस लाख रुपयांची रक्कम आहे. संस्थेत एकही खाते बनावट नाही. खरातला संबंधित पैसे आले कोठून आणि दिले कुणाला, हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मोठ्या रकमा आॅनलाईन ट्रान्सफर झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी सरव्यवस्थापक सचिन भट्टड उपस्थित होते.
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार; राज्य शासनाची सुधारित आखणीला मंजुरी, नेमका कसा असेल मार्ग..शिर्डी पोलिसांनी पत्राद्वारे कॅप्टन अशोक खरात संबंधित माहिती मागितली. त्याचा खाते उतारा आम्ही अवघ्या दोन तासांत दिला. याबाबत विपर्यस्त बातम्या येऊ नयेत, यासाठी आम्ही आमची बाजू स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
- संदीप कोयटे, संचालक, समता पतसंस्था