सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांत वाद मागच्या दोन दिवसांपासून सुरू आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन केलं आहे. मराठा असो किंवा धनगर असो तुम्ही शांततेने घ्या. आपण बसून या विषयावर तोडगा काढू असे मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आणि धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतोय का असा काही डाव असू शकतो का यावर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे असे म्हणत पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय.
Nashik Crime: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणात नाशिकच्या ‘कॅप्टन’ला अटक, नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे ५८ व्हिडिओ जप्तअंजनगावातील मराठा आणि धनगरबांधवांना आवाहन आहे की कुठल्यातरी नेत्यांच ऐकून कोणी भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करेल. नेत्याला याची गरज नसते, ते नेहमीच इकडे तिकडे पळत असतं. बोंबलण्याची त्याला ती सवय असते असे टीकास्त्र सोडले आहे.
Solapur News | सोलापूरमधील उपोषणकर्त्याची तब्येत खालावली | SAAM TV छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याच्या मागणीवर लक्ष्मण हाके ठामसोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा पुतळा सन्मानपूर्वक हलवून तो सरकार किंवा संबंधितांनी दिलेल्या जागेत उभारावा आणि सध्याच्या ठिकाणी ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, गुरुवारी मध्यरात्री गुपचूप मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न धनगर समाजाच्या देवस्थानावर हक्क सांगण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधानतसेच, चिखला येथे पूर्वी ज्या पद्धतीने महिलेला पुढे करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता, तसाच प्रकार पुन्हा घडवण्याचा प्रयत्न आमदार पाटील यांच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून झाला, असा दावाही हाके यांनी केला. मात्र, धनगर समाजाच्या बांधवांनी संयम राखल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. तरीही, लक्ष्मण हाके यांनी प्रशासनाला इशारा देत कोणत्याही परिस्थितीत पुतळा सन्मानाने हलवण्याची मागणी कायम ठेवली आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून परिसरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी सतर्कता वाढवली आहे.