Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; 'माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा'
esakal April 03, 2026 02:45 PM

Rahane Responds Strongly to Critics: आयपीएल 2026 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काल सामना झाला, नाणेफेक जिंकून कोलकाताच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या दमदार फलंदाजीमूळे कोलकाताला २२६ धावांच आव्हान दिल होत. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाने सुरुवातीला जबरदस्त फलंदाजी केली, ज्यात सुरुवात ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्माने चांगलीच दमदार केली त्यांनी ५.४ षटकांत ८२ धावा जोडताना कोलकाताच्या गोलंदाजाना हतबल केले.

ट्रॅव्हिस हेडने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. अभिषेक शर्माने २१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या. त्यांच्या वादळी खेळीमूळे हैदराबाने कोलकाताला ६५ धावांची हरवल. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने टीकाकारावर जोरदार प्रत्युत्तर दिले.

Axar Patel catch Harry Brook T20 World Cup : अक्षर पटेलच्या चपळ क्षेत्ररक्षणाने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताला मिळवून दिला महत्त्वपूर्ण विजय

२२६ धावांचा पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची सुरुवात खराब ठरली. सलामीला आलेला अजिंक्य ८ तर फिन अॅलन २८ धावा करून परतले. अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंहने मधल्या फळीत चांगली खेळी केली रघुवंशीने ५२ तर रिंकूने ३५ धावा केल्या, असल्या तरी कोलकाताला ६५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

ईडन गार्डनवर पराभव झाल्यानंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टीकाकारांना चांगल उत्तर दिल याच्या फलंदाजीच्या शैलीवर टीका करण्यात आली होती त्यावर बोलताना तो म्हणाला, स्ट्राईक रेट बद्दल देखील बाहेर टीका होत आहे. मला अस वाटतय की माझा स्ट्राईक रेट चांगला आहे. पुढे तो म्हणाल माझ्याबद्दल बोलणारे सामाना नीट पाहत नाहीत. त्यांना माझा खेळ बघायला आवडत नाही.

T20 World Cup, IND vs SA: फलंदाजांनी ठोकलं, गोलंदाजांनी रोखलं! भारताचा सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

मला जे यश मिळालं आहे ते टीकाकारांना आवडत नाही. त्यांना याचा त्रास होतो. पुढे बोलताना रहाणे म्हणाला माझ्याविरोधात विशिष्ट अजेंडा आहे. जे लोक बोलत आहे, त्यांना खेळाबद्दल माहिती नाही अस मला वाटत. मी वेगळ्या प्रकारे खेळाव अशी त्यांची इच्छा आहे. कालच्या सामन्यात रहाणे पुन्हा सलामीला आला परंतू पॉवरप्लेमध्ये तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही, आणि १० चेंडूत ८ धावा करून बाद झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.