'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'
esakal April 03, 2026 02:45 PM

LALIT PRABHAKAR REVEALS HE WAS BEDRIDDEN FOR A MONTH: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकरची सध्या चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अनेक सिनेमे आणि मालिकामधून ललितने स्वत:ची ओळख निर्माण केली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील आदित्यची पात्र तर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान सध्या ललित त्याचा आगामी सिनेमा 'सुपर डुपर' मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा आज म्हणजेच ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना पहायला मिळतोय.

एका मुलाखतीत बोलताना त्याने त्याच्या आजारपणाबद्दल तसंच त्याच्या फिटनेसबद्दल सांगितलं तो मुलाखतीत बोलताना म्हणाला की, 'सिनेमात शर्टलेस शुटसाठी फिट दिसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. तसंच त्यावेळी सेटवरील सगळ्यांचा त्याला सपोर्ट मिळाला.'

आजारपणाबद्दल सांगताना ललित म्हणाला, 'फिटनेससाठी खुप मेहनत घ्यावी लागली कारण त्यावेळी मी खूप आजारी होतो, मी महिनाभर अंधरुणाला खिळलेलो होते. माझं शुटिंग तोंडावर आलं होतं परंतु तेव्हा शुट करताना खुप मज्जा आली. सगळ्यांचे हावभाव सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. तिथे देखील मला त्या सीनसाठी अनेक कमेट्स मिळाल्या होत्या.'

View this post on Instagram

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)