Marathi Rashi Bhavishya : एप्रिल महिन्याच्या येत्या आठवड्यात म्हणजे 6 एप्रिल ते 12 एप्रिलमध्ये दोन राजयोग बनणार आहेत. या आठवड्याच्या मध्यावर गजकेसरी राजयोग आणि आठवड्याच्या शेवटी बुधादित्य राजयोग बनणार आहे. या आठवड्यात चंद्र धनु राशीत प्रवेश करणार असून गुरु केंद्रात असेल. तर गुरु मिथुन राशीत आणि चंद्र धनु राशीत असल्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. तर बुध आणि सूर्याची युती होऊन बुधादित्य राजयोग बनेल. याचा फायदा पाच राशींना होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.
वृषभ रास :
वृषभ राशीच्या लोकांना एप्रिल महिन्याचा हा आठवडा अत्यंत अनुकूल जाईल. या आठवड्यात धनलाभाचे अनेक योग बनत आहेत. याबरोबर कामासाठी केलेले प्रवास लाभदायी ठरतील. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे मन अशांत असेल. पण घरातील पित्यासमान व्यक्तीच्या मदतीने तुमची आर्थिक प्रगती होईल. करियरच्या बाबतीत पाहिलं तर या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण कराल.
मिथुन रास :
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले करेल. एखादा नवा प्रोजेक्ट तुम्हाला सहजरित्या मिळेल. त्याबरोबरच तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा चांगली असेल. प्रेमी जीवनात कोणतीतरी आनंदाची बातमी मिळेल. तब्येतीच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. झोपेचं वेळापत्रक बदलेल. प्रवास टाळा. आठवड्याच्या अखेरीस चांगली बातमी मिळेल.
कर्क रास :
कर्क राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. तब्येतीत सुधारणा होईल. घरात तुमचे मन प्रसन्न असेल. प्रवासात तुमच्या नव्या ओळखी तयार होईल. करियरला नवी दिशा देण्यात कुणीतरी तुमची मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सुधारेल.
कन्या रास :
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. नवीन गुंतवणूक कराल. या आठवड्यात तुम्ही केलेले प्रवास यशस्वी होतील. कामाच्या बाबतीत तुम्ही विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त करून देतील. आठवड्याच्या अखेरीस सेलिब्रेशनचे योग बनतील.
वृश्चिक रास :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना तुमच्या करियरला नवीन बळ देणारा ठरेल. प्रवासाचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या मिळतील. कुटूंबाची मदत होईल. नात्यातील महिलेची मदत तुम्हाला मिळेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच