किवळेत एसबीआयची शाखा सुरू
esakal April 04, 2026 09:45 PM

किवळे, ता. ४ : किवळे परिसरात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या राष्ट्रीयकृत बँकेची नवी शाखा अलीकडेच सुरू करण्यात आली असून यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी एसबीआयची शाखा फक्त देहूरोड येथेच उपलब्ध होती. त्यामुळे किवळेसह देहूरोड पंचक्रोशी तसेच मावळ तालुक्यातील नागरिकांना बँकिंग व्यवहारांसाठी देहूरोडला जावे लागत होते. दैनंदिन व्यवहार, पैसे काढणे, जमा करणे किंवा इतर बँकिंग सेवांसाठी पर्याय मर्यादित होते. किवळे गावात एसबीआयच्या नव्या शाखेची भर पडल्याने नागरिकांच्या वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.