हिंदुजा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. नवीन पंजाबी यांची नियुक्ती
मुंबई, ता. ४ : हिंदुजा फाउंडेशन या हिंदुजा समूहाच्या केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सकडून डॉ. नवीन एम. पंजाबी यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. पंजाबी हे अध्यापन, शैक्षणिक प्रशासन आणि संस्थात्मक नेतृत्व या क्षेत्रातील दशकाहून अधिक अनुभवासह अभ्यासक्रम विकास, विद्यार्थी मार्गदर्शन आणि उद्योग-शिक्षण क्षेत्रातील संवाद बळकट करण्यासाठी ओळखले जातात.