छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG चालकांना अल्पसा दिलासा मिळणार… मुंबईहून 18 टन ऑटो LPG छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार… 30 हजार रिक्षा चालकांपैकी 7 हजार रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरने गॅस दिला जाणार…
Jay Pawar Live: दादांच्या विमान अपघाताचा फायनल अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन – जय पवारदादांच्या विमान अपघाताचा फायनल अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन. बारामतीकर कोणासोबत आहेत हे सर्वांना माहित आहे असं जय पवार बोलले आहेत. ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र आहेत.
Accident live:साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघातसूरत-नागपूर महामार्गावर साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात. क्रूझर गाडी उलटून अपघातात जण 2 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती. सात जण जखमी. लग्नकार्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या क्रुझर गाडीला झाला अपघात. जखमींना साखरे ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
Washim Live : सोनाराला फसवून 30 ग्रॅम सोनं चोरलंवाशीम शहरातील सराफार बाजारात अशोक ज्वेलर्स या दुकानात सोनाराची दिशाभूल करून चलाखीने 30 ग्रॅम सोन्याची चोरी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी केली.
Mumbai Live : मद्य प्राशन केलेल्या पत्नीने केला पतीवर चाकूने हल्लामुंबईच्या जोगेश्वरी भागात खळबळजनक घटना
मद्य प्राशन पत्नीने केला पतीवर चाकूने हल्ला
मोहोम्मद रफिक कुरेशी अस तक्रारदार पतीचे नाव
प्लम्बर असणारा मोहोम्मद कामाहून घरी परतला असताना पत्नी दारूच्या नशेत असल्याच आढळलं
रोज रोज दारू का पितेस असं विचारलं अन दोघांमध्ये झाला वाद
रागाच्या भरत पत्नीने भाजी चिरणाऱ्या चाकूने केला पतीवर वार
पतीच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरू
पत्नी सबा कुरेशी विरोधात आंबोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हाचेंबूरमधील माजी बीएमसी नगरसेवक रमेश कांबळे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपावरून तब्बल २० वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांनी १९९८ मध्ये अनुसूचित जातीचे (SC) बनावट प्रमाणपत्र मिळवून २००२ मध्ये आरक्षित जागेवरून निवडणूक जिंकली, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
२००५ मध्ये जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र बनावट ठरवले होते, तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता.तरीही त्यावेळी गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र आता तक्रारीनंतर चेंबूर पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे वापरण्याचे गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
Nashik News: दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजविण्याचे काम सुरू- दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजविण्याचे काम सुरू
- चारचाकी गाडी विहिरीत पडल्याने नऊ जणांचा मृत्यू
- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील घटना इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू
- विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीपासून गायब असल्याची माहिती
- विहिरीच्या मालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विहीर बुजवण्याचं काम सुरू
पुणे - बेंगलोर महामार्गावर एका ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला धडक, दोघे जखमीपुणे - बेंगलोर महामार्गावर कात्रज नवीन बोगद्या जवळच्या जांभुळवाडी दरी पुलाजवळ,एका ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना
हे दोन्हीही ट्रेलर भल्या मोठ्या क्रेनच्या पार्टची वाहतूक करत होते.. यातील एका ट्रेलरची पुढच्या ट्रेलरला मागून धडक बसल्याने यात क्रेनचा पार्ट थेट ट्रेलरच्या केबिनमध्ये घुसला..यामुळं या ट्रेलरच्या केबिनचे मोठे नुकसान झालंय..
या अपघातात चालक आणि क्लिनर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे..
कात्रज नवीन बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंत असणाऱ्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक माहिती आहे
Rahul Gandhi: पंतप्रधानांना केरळमध्ये LDF चे सरकार हवे - राहुल गांधीलोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात, "...शबरीमला मंदिराच्या आणि भगवान अय्यप्पांच्या विरोधात सर्वात मोठा गुन्हा घडला—CPI(M) च्या नेत्यांनी मंदिरातून सोने चोरले आणि त्याजागी पितळ ठेवले; तरीही पंतप्रधान त्याबद्दल काहीच बोलले नाहीत? एकही शब्द नाही? का? कारण त्यांना केरळमध्ये LDF चे सरकार हवे आहे. कारण त्यांना हे ठाऊक आहे की, LDF हे भाजपसाठी कधीच धोका ठरू शकत नाही. UDF आणि काँग्रेस हेच भाजप-RSS साठी खरा धोका आहेत."
Pimpri-Chinchwad Live : मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Pune Live : पुणे विमानतळावर गांजाची तस्करीपुणे विमानतळावर पुन्हा एकदा गांजाची तस्करी उघडकीस आली आहे. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून पुणे विमानतळावर गांजाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एअर इंटेलिजन्स युनिटने कारवाई करत सुमारे 34 लाख रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला. एअर इंडियाच्या विमानातून हा गांजा देशात आणून तस्करी करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता.
Washim Live : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केलावाशिम जिल्ह्यातील आडोळी गावातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी सर्वांना विनाअट देण्यात यावी, वाशिम जिल्ह्याला पिकविमा मिळावा आणि खाजगी फायनान्सकडून होणारी कर्जवसुली थांबवावी, या मागण्यांसाठी संपूर्ण आडोळी गावच विक्रीस काढले आहे. या आंदोलनाला आज तिसरा दिवस असून, या आंदोलनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ कृषीमंत्री व वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुतळा जाळून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
IPL 2026: MI vs DC मध्ये आज दुपारी 3.30 रंगणार क्रिकेटचा सामनाआयपीएल 2026 ची आठवी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज दुपारी 3.30 वाजता दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाणार आहे.
Palghar Live: पालघरमध्ये बस चालकाची दादागिरी; प्रवाशावर संतापपालघर जिल्ह्यातील सफाळे बस आगारात बस चालकाच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. सफाळे-कोरे बसला उशीर झाल्याने एका प्रवाशाने जाब विचारला असता चालक अश्वजीत कांबळे संतापले. त्यांनी युनिफॉर्म काढत प्रवाशांवर आक्रमक वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी होत आहे.
पालघरमध्ये विराज प्रोफाइल विस्ताराविरोधात आंदोलन; रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्पबोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीच्या 104 एकर विस्ताराविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. बोईसर-चिल्हार मार्गावर सर्वपक्षीयांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कंपनीमुळे आधीच वायू व पाणी प्रदूषण वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विस्तार झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. 8 एप्रिलची जनसुनावणी रद्द करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
Satara live news : जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊटप्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्व सदस्य पडले सभागृहातून बाहेर
सातारा जिल्हा परिषद च्या पायऱ्यांवर बसून दोन्ही पक्षाच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी
हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावटपावसाच्या शक्यतेमुळे हनी सिंगच्या आजचा होणारा शो पुढे ढकलण्यात आला
आज होणारा पुण्यातील हनी सिंग याचा लाईव्ह शो १८ एप्रिल रोजी होणार
पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून होत आहे जोरदार पाऊस
आजही पुणे शहरात पावसाची शक्यता
पुणे शहरातील याच खराब हवामानामुळे हनी सिंगचा शो पुढे ढकलण्यात आला आहे
यासह पुणे पोलिसांकडून हनी सिंगच्या शो वर काही अटी व शर्ती देखील लागू करण्यात आल्या आहेत
हनी सिंगच्या लाईव्ह शो मध्ये मद्य विक्री करता येणार नाही यासह असभ्य भाषेवर देखील बंदी घालण्यात आली आहे
कोल्हापूरमध्ये एका वडाच्या झाडावरून दोन गावात वादकोल्हापूर जिल्ह्यात दोन गावांमध्ये सीमावादाऐवजी आता चक्क एका वडाच्या झाडावरून संघर्ष पेटलाय. शंभर ते दोनशे वर्षे जुने असलेले हे ऐतिहासिक वड तोडण्याच्या प्रयत्नाला मजरेवाडी ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत कारवाईला सोमवारपर्यंत स्थगिती दिलीय.
Satara : सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार; सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यतासातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडी आज होणार होत्या. मात्र, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला बेकायदेशीर ठरवत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला.
निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांनी सहभाग नोंदवण्यास नकार दिला. या बहिष्कारामुळे भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pune Live : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीतपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेंढपाळांवर तिहेरी संकट ओढवलं आहे. बिबट्याच्या हल्ल्याची भीती, कडाक्याचं ऊन आणि अवकाळी पाऊस-गारपिटीमुळे शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू होत असून त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Yewala: येवल्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्याने बाजरी पिकाला फटकाYewala: येवल्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्याने बाजरी पिकाला फटका
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्यांची उन्हाळ बाजरी, मका पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.अचानक आलेल्या पावसाने व जोरदार वाऱ्याने पिके आडवी झाली. शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी अपघातातील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची घेतली भेटमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी अपघातातील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांची घेतली भेट
- एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा
- मृतांच्या नातेवाईकांचं झिरवाळ यांनी केलं सांत्वन
- तर मंत्री गिरीश महाजन देखील अपघात स्थळी पोहचले
- अपघात स्थळाची पाहणी करून अपघातासंदर्भात घेतली माहिती
महिनाभरात बस्तर विभागात १७० नक्षलवादी शरणमहिनाभरात बस्तर विभागात १७० नक्षलवादी शरण
बस्तर विभागात गेल्या ३१ दिवसांत सुमारे १७० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून, त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले आहे. यात कट्टर नक्षलवादी पापाराव याच्यासह अनेक सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती बस्तर क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली.
सांगलीत हद्दपार गुंडाकडून रुग्णवाहिकेची तोडफोडसांगलीत हद्दपार गुंडाकडून रुग्णवाहिकेची तोडफोड
सांगली येथील शासकीय रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळ उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिकेची काल रात्री तोडफोड करण्यात आली. हद्दपार गुन्हेगाराच्या या राड्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
परिसरातील नागरिकांनी तातडीने एलसीबी निरीक्षक संजीव झाडे यांना माहिती दिली. त्याच्या पथकाने तत्काळ त्या हद्दपार गुन्हेगारावर कारवाई केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला. प्रसाद ऊर्फ प्रशांत दिलीप चौगुले (वय २७, रा. इंदिरानगर, सांगली) असे त्याचे नाव आहे.
Nashik Live : भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागलेला नाही शोधनाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून त्याची पत्नी कल्पना खरात हिचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष तपास पथकासह नाशिक आणि शिर्डी येथील पोलीस पथके तिच्या शोधासाठी सतत प्रयत्न करत आहेत. दरम्यान, कल्पनाच्या नातेवाईकांसह तिच्या मैत्रिणींचीही सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, तिच्या विरोधात पोलिसांनी शोध मोहीम अधिक तीव्र करत लूक आऊट नोटीस जारी केली आहे, त्यामुळे या प्रकरणातील उत्कंठा आणखी वाढली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Live: रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट, गॅसदरवाढ आणि तुटवड्याने जगणं कठीणछत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. एका बाजूला गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला गॅस मिळवण्यासाठी चालकांना तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. शहरात एक दिवसाआड केवळ एकाच पंपावर गॅस उपलब्ध होत असल्याने चालकांना गॅस मिळण्याच्या आदल्या रात्रीपासूनच रांगेत उभे राहावे लागते. पूर्वी कमी दरात मिळणारा गॅस आता दुप्पट दराने मिळत असल्याने खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे अनेक चालक मानसिक तणावाखाली असून काहींनी अत्यंत टोकाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Satara News : येरवळेत जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारविंग : येरवळे (ता. कऱ्हाड) येथील जवान संतोष अण्णा जाधव (वय ३८) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष जाधव हे ७०२ इंजिनिअर प्लांट आसाम जोराहट मिलिटरी स्टेशन येथे कार्यरत होते. २३ मार्चला ते गावी सुटीला आले होते. अचानक आजारी पडल्याने कऱ्हाडच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यात त्याचे गुरुवारी रात्री निधन झाले.
Madha News : अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला!माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद मिटला असून गावातील वातावरण निवळले आहे. दरम्यान माढा सोलापूर मार्गावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याने रस्ता खुला झाला आहे. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आज दिवसभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करून योग्य त्या ठिकाणी बसवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Weather Update : राज्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारापुणे : आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली (Maharashtra Weather Alert Today) आहे. इथे क्लिक करा...
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखलकांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ६० लाखांची जागा वृद्धाश्रमाच्या नावे २२ लाख २५ हजार इतक्या कवडीमोल भावात खरेदी करून प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली. भोंदू खरातविरोधात आत्तापर्यंत १२ गुन्हे दाखल, १२ पैकी ८ लैंगिक शोषणाचे तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत.
Phaltan Panchayat Samiti : जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकडून फलटण पंचायत समितीत २० लाखांचा गैरप्रकारफलटण : जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने फलटण पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर सेवेत असताना वेतनामध्ये गैरप्रकार करून तब्बल २० लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Dindori Car Accident : दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत; स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना दुर्घटनाLatest Marathi Live Updates 04 April 2026 : नाशिकच्या दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका खासगी क्लासचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव समारंभ आटोपून घरी परतत असताना, विद्यार्थ्यांसह पालकांची कार विहिरीत कोसळून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि ३ पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात एका खासगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.