Khawaja Asif Threaten to Attacked on Kolkata: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना युद्धज्वराने पछाडले आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांनी त्यांच्या नाकात दम आणलेला आहे. तर यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. आता आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. जर भविष्यात दोन्ही देशात संघर्ष उद्भवला. तर पाकिस्तान मुंबई, दिल्लीच नाही तर कोलकत्यावरही हल्ला करेल अशी बडबड त्यांनी केली. ख्वाजांचे वक्तव्य दोन्ही देशातील तणाव वाढवणारं मानलं जात आहे. त्याला आता भारताकडून काय उत्तर मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑपरेशन सिंदूरचा वर्मी घाव विसरला पाक
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. त्यांनी भारताविरोधातील संभावित तणावाविषयी बोलताना व्यर्थ बडबड केली. भविष्यात भारतासोबत संघर्ष पेटला तर पाकिस्तान आता सीमावर्ती भागावर अथवा मुंबई, दिल्लीपर्यंत मर्यादित राहणार नाही. कोलकत्ता शहरावर सुद्धा थेट हल्ला करणार असल्याची धमकी त्यांनी दिली. शनिवारी, 4 एप्रिल रोजी सियालकोटमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी भारताने आता कोणतेही साहस करू नये, नाहीतर त्यांचे पूर्वेतील सर्वात मोठे शहर कोलकत्तावर आम्ही थेट हल्ला करू अशी पोकळ धमकी त्यांनी दिली. ख्वाजा आसिफ यांना ऑपरेशन सिंदूरचा विसर पडल्याचे आता म्हटले जात आहे.
पाकला बदनाम करण्याचा भारताचा डाव
ख्वाजा आसिफ म्हणाले की भारत हा फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची तयारी करत आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा भारताचा डाव आहे. पण भारत कशा प्रकारे पाकिस्तानला बदनाम करतोय, त्याचे पुरावे विचारले असता ख्वाजा आसिफ त्यावर बोलले नाहिी. पण भारत पाकिस्तानी नागरिकांना आणि त्यांच्या नागरिकांच्या माध्यमातून पाकला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ख्वाजा यांनी केला.
यापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या तर यावेळी पाकिस्तानने स्वप्नात विचार केला नाही असा धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. यावेळी निर्णायक कारवाई करण्यात येईल असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला होता.