'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 05, 2026 10:13 PM

Vishnu Vishal Social Media Break: अॅक्टर आणि प्रॉड्युसर विशाल विष्णू (Vishal Vishnu) प्रोफेशनलसह बऱ्याचदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असतो.  त्यानं आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच हिट चित्रपटांसाठी (Entertainment) काम केलं आहे.  दरम्यान, विष्णू विशाल सध्या आपल्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. त्यानं सोशल मीडियातून (Social Media) ब्रेक घेत असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यानं याची माहिती चाहत्यांमध्ये शेअर केली आहे. यावेळी त्यानं आपल्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, तो लवकरच  त्याच्या आगामी  प्रोजेक्ट्सबद्दल माहिती घेऊन लवकरच परत येईल. दरम्यान, विष्णू विशालने सोशल मीडियातून का ब्रेक घेतला? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. 

विष्णू विशालने सोशल मीडियातून ब्रेक घेणार असल्याचं सांगितलं. ही माहिती देत  त्यानं म्हटलं की, 'सोशल मीडियातून एक छोटा ब्रेक घेत आहे.  लवकरच आगामी प्रोजेक्ट्सच्या निगडीत नवनवीन अपडेट्स घेऊन मी परत येईन', असं अभिनेता म्हणाला.   त्यानं इन्स्टाग्राम स्टोरीतून चाहत्यांना याची माहिती दिली.  विष्णू विशालने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चित्रपटांसाठी काम केलं आहे.  त्यानं आपल्या कारकि‍र्दीत 'वेनिला कबाडी कुझु', 'कुल्नारी कूट्टम' आणि 'रतसासन' या चित्रपटांसाठी काम केलं.   

काही महिन्यांपूर्वी अभिनेता दुसऱ्यांदा झाला होता बाबा

अभिनेता विशाल विष्णूने 2021मध्ये बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टूशी विवाह केला होता.  त्यांना एक मुलगा आणि मुलगी असल्याची माहिती आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी या प्रसिद्ध कपलनं दुसऱ्या बाळाचं आपल्या परिवारात स्वागत केलं.  एप्रिल 2025 मध्ये ज्वाला गुट्टानं गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन ही  आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishnu Vishal (@thevishnuvishal)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेता लवकरच आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. 'इरंडू वानम' या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती आहे. माहितीनुसार,  या चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाली असून, लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  तसेच 2022 साली प्रदर्शित झालेल्या 'गट्टा कु्स्ती' या सिनेमाच्या सिक्वेलमधूनही विष्णू विशाल  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.