गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातही (IPL 2026) आपला दबदबा कायम ठेवला आहे. आरसीबीने रजत पाटदीरा याच्या नेतृत्वात रविवारी 5 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला आहे. आरसीबीने यासह आपली विजयी घौडदोड सुरु ठेवली आहे. आरसीबीने सीएसकेसमोर 251 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात चेन्नईनेही विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण जोर लावला. मात्र टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी पडल्याने यलो आर्मी विजयापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. चेन्नईला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने चेन्नईसमोर 19.4 ओव्हरमध्ये गुडघे टेकले. आरसीबीने यलो आर्मीला 207 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 43 धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला.
आरसीबीने सांघिक कामिगिरीच्या जोरावर हा विजय मिळवला. मात्र सर्वाधिक योगदानाबाबत बोलायचं झालं तर टीम डेव्हीड आणि भुवनेश्वर कुमापर या दोघांनी धमाका केला. टीमने आधी 70 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेत चेन्नईला ऑलआऊट करण्यात सर्वाधिक योगदान दिलं.