कौटुंबिक वादानंतर पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी, नैराश्य अन् विरहात बुडालेल्या विवाहितेच टोकाचं पाऊल, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते' म्हणत गळ्याला दोर लावला
तुषार कोहळे April 06, 2026 10:43 AM

Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील कोरडीच्या महादुला परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते…' अशी चिठ्ठीतून वेदना व्यक्त करत एक विवाहितेने माहेरी गळफास (Nagpur Crime) घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मयुरी मेंढे अस मृतक विवाहितेच नाव असूनान महादुला परिसरात हि धक्कादायक घटना घडलीय. यात आत्महत्येपूर्वी (Nagpur Crime News) लिहलेल्या भावनिक चिठ्ठीतुन पतीवर प्रेम व्यक्त करत मनातील दुःख मांडले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Nagpur Crime: मी तुमच्यावर खूप प्रेम करते…” चिठ्ठीतून वेदना व्यक्त, विवाहितेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या

मिळलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. त्यातून मानसिक ताण वाढला आणि महिनाभरापूर्वीच माहेरी परतली होती. या दरम्यान पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन न उचलल्याने पत्नी हताश झाली होती. नैराश्य आणि विरहात बुडालेल्या मयुरीने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. अशातच घरातील मंडळी बाहेर गेले असताना तिने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवले.

Nagpur Crime News : पतीकडून मानसिक त्रास दिल्यानं हि घटना घडली, माहेरच्यांचा आरोप

दरम्यान, मयुरीचे कुटुंबीय रात्री घरी परतल्यावर दार आतून बंद होतं. बराच वेळ दार ठोटावलं असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनतर रुग्णालयात नेले असता मयुरीला मृत घोषित करण्यात आलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून माहेरच्यांनी या प्रकरणी गंभीर रोप केले आहे. पतीकडून मानसिक त्रास दिल्यानं हि घटना घडली, असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली असून भावाच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे. सध्या कोराडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.