Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित
Saam TV April 06, 2026 10:45 AM
Dharashiv: धाराशीवमध्ये मार्चमध्ये १४०७ हेक्टरवरील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान, प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर

धाराशिव जिल्ह्यात मार्च व एप्रिल मध्ये ही अवकाळीने कहर केला असुन यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.सलग पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागासह रब्बी हंगामातील बायागती व जिरायती पिकांचे मोठ नुकसान झाल आहे.याबाबत कृषी विभागाने मार्च महीन्यातील 1407 हेक्टरच्या नुकसानीचे पंचनामे केले असुन शासनाकडे प्राथमीक अहवाल पाठवला आहे.तर एप्रिल मधील नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

Raigad: अनेक वर्षे पाणी टंचाई असणाऱ्या पाचाड गावाला पाणी मिळणार

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभिर आहे. सद्या ग्राम पंचायतीमार्फत आठवड्यातुन एक वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. किल्ले रायगडामुळे येथे पर्यटक येतात मात्र पाणी नसल्याने त्यांचे हाल होतात. येथील हॉटेल व्यवसायीकांना पाणी विकत आणाव लागत. पाणी टंचाईच गाऱ्हाण ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासमोर मांडल. यावेळी संबधीत अधिकारी, पाचाडच्या सरपंच सिमा बेंदूगडे यांची बैठक बोलावुन वाकडीकर यांनी एक महिन्यात काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. एक महिन्यात पाणी पुरवठा सुरु झाला नाहीतर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिला आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित

भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बारामती मध्ये राहणार उपस्थित

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बावनकुळे राहणार उपस्थित

पुण्यात भाजपच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपवून बावनकुळे बारामतीत येणार

Mumbai: मालाड पूर्व संतोष नगर येथे दोन गटात तुफान हाणामारी

मुंबई -

मालाड पूर्व संतोष नगर येथे दोन गटात तुफान हाणामारी

मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोष नगर मार्केट परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

संतोष नगर परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडल्याची माहिती.

घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल.

Baramati: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

बारामती -

बारामती पोटनिवडणूक अपडेट

सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

काँग्रेसचे आकाश मोरे निवडणुकीच्या रिंगणात

Pune: शिरूरच्या आपटीत बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्याच्या धाडसाने बैल बचावला

शिरूर तालुक्यातील आपटी येथे राम गाडेकर यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला.

मात्र शेतकऱ्याने धाडसाने प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली.

बैलाच्या मानेवर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून घरगुती उपचार करण्यात आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.