नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात चे प्रकरण समजल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप, प्रचंड चीड, क्रोध व्यक्त केला आहे. दरम्यान, निमगुळ तालुका धुळे येथील बचत गटाच्या महिलांनी देखील भोंदूबाबांविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
यावेळी सिंधुबाई मोरे, आशाबाई पाटील, विद्याबाई पाटील, जनाबाई मोरे, ताराबाई पाटील, संगीता मोरे आदी महिला उपस्थित होत्या. महिलांनी एकत्र येत भोंदू बाबांना गावबंदी, घरात बंदी… असा निर्णय घेतला आहे… सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा प्रकरण अधिक तापलं आहे.
सध्या अशोक खरात प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून रोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी खरात याच्या मुलाची देखील चौकशी केली. ज्यामध्ये त्याने बापाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. पण आता तो फरार आहे… एवढंच नाही तर, खरात याची पत्नी देखील फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत.