कुंभमेळ्यातल्या व्हायरल IIT बाबाने केलं लग्न, फोटो व्हायरल; पत्नी प्रतिका दिसते कशी?
Tv9 Marathi April 06, 2026 09:46 PM

प्रयागराज येथीस महाकुंभ मेळ्यामध्ये आपल्या वेगळ्या अंदाज आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वामुळे देशभर चर्चेत आलेले आयआयटीयन बाबा अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण आहे त्याचे लग्न. सोमवार, ६ एप्रिल रोजी अभय सिंह हरियाणातील झज्जर येथे आपल्या पत्नीसोबत दिसले. त्यांनी सांगितले की, दोघांनी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेजही केले.

अभय सिंह म्हणाले, “मी आणि माझी पत्नी आमच्या नवीन जीवनात खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही साधेपणाने जीवन जगत आहोत.” त्यांच्या पत्नी प्रतिका कर्नाटकची रहिवासी आहे आणि त्या देखील इंजिनियर आहेत. लग्नानंतर दोघे सध्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे राहत आहेत.

IIT baba Abhay Singh

सोमवारी अभय सिंह झज्जर येथे आपल्या कुटुंबीयांना, आई-वडिलांना भेटायला गेले होते. भगवी वस्त्रे परिधान केलेले अभय सिंह आपल्या वडिलांच्या चेंबरमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी जुनी आठवण सांगितली की, आध्यात्मिकतेकडे वळण्यापूर्वी ते वडिलांच्या चेंबरमध्ये बसून कायदेविषयक अर्ज आणि केस स्टडीज पाहत असत. अभय सिंह म्हणाले, “जीवनाचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेत मी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगातून आध्यात्मिक मार्गाकडे वळलो.”

प्रतिका म्हणाल्या, “अभय अत्यंत साधे, प्रामाणिक आणि खरे माणूस आहेत.” दोघांची ओळख जवळपास एक वर्षापूर्वी झाली होती. प्रतिका म्हणाल्या की, आता दोघे मिळून सनातन धर्म आणि आध्यात्मिकता पुढे नेण्याचे काम करतील. भविष्यात ‘सनातन युनिवर्सिटी’ स्थापन करण्याचीही त्यांची योजना आहे, जिथे गुरू, साधक आणि आध्यात्मिक लोक एकत्र येऊ शकतील.

अभय सिंह मूळचे झज्जर जिल्ह्यातील सासरौली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील कर्ण सिंह पेशाने वकील आहेत आणि झज्जर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. अभय यांनी आयआयटी बॉम्बे येथून एरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी घेतली होती. नंतर त्यांनी कॅनडातील एका एरोस्पेस कंपनीत नोकरीही केली. तेथे त्यांना दरमहा सुमारे ३ लाख रुपये पगार होता. मात्र, नंतर त्यांनी सर्व काही सोडून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला.

महाकुंभ २०२५ मध्ये साधू वेषात दिसल्यानंतर आयआयटीयन बाबा अभय सिंह सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनेल्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यशस्वी इंजिनियर ते आध्यात्मिक साधक बनण्याची त्यांची कहाणी देश-विदेशात खूप चर्चिले गेली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.