Sanjay Shirsat | तर सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; संजय शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ; नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi April 06, 2026 09:46 PM

“जेव्हा आघाडी होणार होती तेव्हा शेवटपर्यंत, म्हणजेच राष्ट्रवादी उबाठाबरोबर गेली होती. पण काँग्रेसने सांगितलं आम्हाला हायकमांडचा आदेश आला पाहिजे. सात वाजेपर्यंत राज्यपाल यांना पत्र द्यायचे होते. मात्र तरीही काँग्रेसने त्यांना कोणताही होकार दिला नव्हता. काँग्रेस पक्ष इतर पक्षाच्या नव्हे त्यांच्या नीतीवर चालते, त्यावेळी काँग्रेसमुळे आपलं सरकार पडलं हे आता यांना आता जाणवत आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केले. संजय शिरसाट राज्य सरकारमध्ये मंत्री असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार आहेत. “मात्र त्यापूर्वी सहा महिने आधीच हे सरकार पडलं असतं. त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणीवपूर्वक तालुका अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. त्यावेळी 12 आमदार काँग्रेसचे निलंबित केले. त्यामुळे या सरकारचं मरण सहा महिने पुढे ढकललं” असं संजय शिरसाट बोलले. “आमच्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी मला सडवलं आणि ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला सन्मान दिला. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागत आहे. आमचे बंड 6 महिने आधीच झाले असते. आमदारांना जे निलंबित केले, त्यामुळे न्यायालयात जावे लागले ना, थोडा गोंधळ केला म्हणून निलंबित केले गेले होते. असे कधी होत नसते. त्यांना निलंबित करण्याचे कारण म्हणजे याचे विकोपा वाढत होता, तो विकोपा दिसू नये म्हणून आधी 12 आमदार कमी केले” असा दावा संजय शिरसाट यांनी केला. “एखादा नेत्याचं निधन झाल्यावर बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, आपली संस्कृती आहे. आता काँग्रेस ज्याप्रमाणे उमेदवार उभा करत आहे, त्यामुळे सुरू असलेल्या परंपरा छेद जात आहे” असा बारामती पोटनिवडणुकीवर संजय शिरसाट म्हणाले. “पक्षाचा विषय आहे. बॅनर कुणी लावले महाराष्ट्राला माहीत आहे, अजित दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात धुसफुस वाढत आहे” असं शिरसाट म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.