Akola News : अकोला शहरातील गायगाव अकोला रस्त्यावर धक्कादायक घटना घडली आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला आहे. अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दिली भेट दिली.
मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यामुळं घातपात झाल्याची शक्यता
प्राथमिक तपासात हा मृतदेह अंदाजे 50 वर्षीय वयोगटातील महिलेचा असल्याचे समोर आले आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यामुळं या प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्यासह मृत्यू मागील कारण शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, महिलेचा मृतदेह हा जळालेल्या अवस्थेत आढळल्यामुळं तर्क वितर्क लावले जात आहेत. हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. तपासनंतरच या घटनेमागचे सत्य समोर येणार आहे.