Parbhani News: परभणीत वंचित बहुजन आघाडीचे चुलीवर स्वयंपाक आंदोलन, गॅस टंचाईविरोधात तातडीची मागणी
esakal April 07, 2026 11:45 AM

परभणी: राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (ता.सहा) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सिलिंडरचा तुटवडा आणि वाढत्या अडचणींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करत चुल पेटवा आंदोलन केले.

गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Parbhani News: महापालिकेच्या गाळे भाडेवाढीचा तिढा सुटणार?; न्यायालयाच्या निकालामुळे दिलासा, गाळेधारक अर्ज दाखल करण्याच्या तयारीत

काही ठिकाणी गॅसअभावी अपघात व मृत्यूच्या घटनाही घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, गॅसअभावी हॉटेल्स, चहा - नाश्त्याचे स्टॉल, ढाबे आणि इतर लहान व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.

लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम आणि केटरिंग व्यवसायावरही या टंचाईचा मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला असून, अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था बिघडल्याने विद्यार्थ्यांना गावाकडे परत जावे लागत आहे.

Premium|Mental health awareness India : सोशल मीडियाचे व्यसन की मानसिक आजार? तरुण पिढीच्या मानसिक आरोग्यावर वाढत्या डिजिटल विळख्याचे गंभीर परिणाम

याशिवाय, काही शहरांमध्ये एलपीजी गॅस कमी प्रमाणात मिळत असल्याने दरवाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.