भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, आता घरच्यांनाही बसणार झटका, आज खरातच्या मुलीला..
Tv9 Marathi April 07, 2026 12:45 PM

लोकांच्या भीतीचा, समस्येचा वापर करून घेऊन त्याचाच व्यापार कसा केला याची निर्लज्जपणे कबुली देणारा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) सध्या तुरूंगाच्या गजाआड आहे. 18 मार्चला त्याला अटक करण्यात आली असन महिलांवर अत्याचार केल्याचा, त्यांचं लैंगिक शोषण, नको ते व्हिडीओ बनवणं, अनेक लोकांची मानसिक, आर्थिक फसवणूक करणं, पैसे लुबाडणं असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यातून रोज अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येताना दिसत आहेत. एकीकडे पोलिस खरातची कसून चौकशी करत असून दुसरीकडे त्याच्याशी संबंधित लोकं,कुटुंबीय यांनाही तपासाला सामोरं जावं लागत आहे.

याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे खरात याच्या मुलीचीहीव आज SIT चौकशी होणार आहे. तिला अनेक प्रश्न विचारण्यात येणार असून याआधी खरातच्या मुलाचीही चौकशी झाली होती.

अशोक खरातची मुलगी तृप्ताबालाची होणार SIT चौकशी

अशोक खरात याची मुलगी तृप्तबाला हिची आज SIT कडून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेकांना फसवणाऱ्या, महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातने बरीच संपत्तीही जमवल्याचे उघड झालं असून त्याने त्याची मुलगी तृप्ताबालाच्या नावावरही कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे. अशोक खरात याच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आज त्याच्या मुलीची चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर लवकरच त्याच्या दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. आज मुलीच्या चौकशीतून खरातबद्दल आणखी काय नवी माहिती समोर येते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

SIT चीआज पत्रकार परिषद

दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाची आज पत्रकार परिषद आहे. भोंदू खरात विरुद्ध नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती देण्यात येणार आहे. – भोंदू अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी सुरू असून, आज महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच बुधवार 8 एप्रिल रोजी भोंदू अशोक खरात याला कोर्टात हजर केले जाणार असल्याने, त्याआधीच म्हणजे आज एसआयटीची पत्रकार परिषद पार पडणार आहे. पत्रकार परिषदेत भोंदू अशोक खरातच्या अनेक काळ्या कारनाम्यांची माहिती देण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.