'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 07, 2026 02:43 PM

Bigg Boss Marathi Sagar Karande: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) सहावा सिझन प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करत आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. मागच्या आठवड्यात कॉमेडियन आणि अॅक्टर सागर कारंडे (Sagar Karande) एलिमिनेट झाला. त्याचा प्रवास मागच्या आठवड्यातच संपला. त्यानं बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच उत्तमरित्या टास्कही खेळले. दरम्यान, कमी मतांमुळे बिग बॉसच्या घरातील त्याचा प्रवास थांबला. काहींनी त्याच्या खेळाचं कौतुक केलं. तर, काहींनी ओव्हअॅक्टिंग म्हणून त्याला ट्रोल केलं. बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी फॅमिली वीक (Bigg Boss Family Week) पार पडला होता. स्पर्धकांचे फॅमिली मेंबर घरात आले होते. सागर कारंडेचीही फॅमिलीही आली होती. त्याची  फॅमिली स्टोअर रुममध्ये होती. दरम्यान, आपल्या फॅमिलीला पाहताच सागर कारंडे थोडा शॉक झाला. तो ज्या पद्धतीने रिअॅक्ट झाला, त्यावरुन सागरला अनेकांनी ट्रोल केलं.  काही प्रेक्षकांनी ओव्हरअॅक्टिंग असं म्हटलेलं आहे.  अशातच या ट्रोलिंगवर सागर कारंडेनं प्रतिक्रिया दिली आहे.   'प्रत्येकाची  व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते', असं मुलाखतीत सागर म्हणाला.

'प्रत्येकाची  व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते' (Sagar Karande Bigg Boss)

मागच्या आठवड्यात सागर कांरडे बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला. त्यानं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसच्या घरातील किस्से शेअर केले.  तसेच ट्रोलिंगवरही भाष्य केलं आहे. सागर म्हणाला, 'ठरवून कसं काय रिअॅक्ट कुणी होऊ शकतं. माझी फॅमिली समोर आल्यानंतर मी असा रिअॅक्ट होईन, असं कोण ठरवून रिअॅक्ट होऊ शकतं का... माझं कुटुंब स्टोअर रुममध्ये येणार, हे कुणाला ठाऊक होतं. सगळ्यांची फॅमिली मुख्य दरवाज्यातून आत येत होती. मी तिथेच दरवाज्यासमोर उभा होतो. मला काय माहित माझी फॅमिली आत स्टोअर रुममध्ये असेल', असं सागर म्हणाला. 

'बिग बॉसने मला जेव्हा सांगितलं की, बॅटरी चेंज करायला जावा, तेव्हा मी स्टोअर रुममध्ये गेलो. तेव्हा मला माझं कुटुंब अचानक दिसलं. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. लोकांना असं का वाटतं की, याने असं व्यक्त व्हायलं नको होतं, आम्हाला ती ओव्हरअॅक्टिंग वाटते. तुम्ही जर असता त्या ठिकाणी, तर कदाचित तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त झाल्या असता, मी आहे म्हणून मी या पद्धतीने व्यक्त झालो, हा सागर कारंडे आहे. प्रत्येकाचं ऐकत बसलो तर...लोकांना वाईट वाटतं का, मग मी असं व्यक्त होतो, मग ते त्यांना खरं वाटेल, असं नाही होत ना...फॅमिली समोर आल्यानंतर होतं'.

'फॅमिलीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी डोक्यात सुरु असतात' (Bigg Boss Fame Sagar Karande on Trollers)

'तीन महिन्यांनंतर तुम्ही जर फॅमिलीचा चेहरा बघताय... आपल्या घरच्यांना आपण टीव्हीवर दिसत आहोत. आपल्याला ते बघत असतात. आपलं वावरणं पाहून, त्यांना कळत असेल की, हा माणूस बरा आहे की नाहीये..आम्हाला काहीच सोर्स नाहीये की, आमच्या घरी नेमकं काय सुरुये आणि कसं चाललंय..ते कसे आहेत? कुणी आजारी आहे का? घरी त्यांना पैसे पुरत असतील ना..  महत्त्वाचं म्हणजे त्यांची तब्येत बरी असेल ना...या सगळ्या गोष्टी डोक्यात सुरु असतात. मी माझ्या पद्धतीने रिअॅक्ट झालो', असं सागर कारंडे म्हणाला.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.