Medical Test: वयाच्या 30 वर्षानंतर महिला-पुरुषांनी कराव्यात या मेडिकल टेस्ट
Marathi April 07, 2026 04:25 PM

हल्ली बदलत्या लाईफस्टाईलमुळे वयोवृद्धांसह तरुणांनाही आरोग्याच्या विविध समस्या जाणवत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी वयाच्या 30 नंतर महिला-पुरुषांनी काही हेल्थ टेस्ट करणे आवश्यक आहे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात विविध बदल होतात, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका असतो. आज जगभरात जागतिक आरोग्य दिन World Health Day साजरा होत आहे. या दिनानिमित्ताने आज आपण प्रत्येक महिला आणि पुरुषाने तिशीनंतर कोणत्या हेल्थ टेस्ट करणे आवश्यक आहे जाणून घेऊयात.

रक्तदाब

वयाच्या तिशीनंतर हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे तिशीनंतर दर सहा महिन्यांनी ब्लड प्रेशर तपासणे आवश्यक आहे. यासोबत तुम्ही जर ECG, लिपिड प्रोफाइल अशा टेस्ट केल्या तर हृदयाच्या आरोग्याची अचूक माहिती मिळते.

मधुमेह

हल्ली तरूणांमध्ये डायबिटीस होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तिशी ओलांडल्यावर फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c टेस्ट नक्की करावी.

थायरॉईड (Thyroid)

थकवा येणं, केस गळणे, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे.. हे थायरॉईडच्या असंतुलनाचे संकेत असू शकतात. त्यामुळे ही टेस्ट करणे आवश्यक आहे.

कॅन्सर स्क्रिनिंग (Cancer Screening)

तिशीनंतर कॅन्सरच्या काही प्राथमिक चाचण्या करणे गरजेचे आहे. यात महिलांनी पॅप स्मियर आणि ब्रेस्ट चेकअप तर पुरुषांनी प्रोस्टेटसंबंधित टेस्ट करणे महत्त्वाचे ठरते.

व्हिटॅमिन D (Vitamin D)

महिला आणि पुरूष दोघांनीही वयाची तिशी ओलांडल्यानंतर व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 टेस्ट करणे आवश्यक आहे. कारण याचे वेळेत निदान झाल्यास उपचार घेऊन गंभीर आजार टाळता येतात.

वरील टेस्ट करण्यास अधिक पैसे खर्च करावे लागत नाहीत आणि वेळही जास्त जात नाही. त्यामुळे 30 नंतरही निरोगी राहायचे असल्यास या मेडिकल टेस्ट नियमित करत राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.

टीप – सदर माहिती फक्त सामान्य माहितीवर आधारीत आहे. Only manini आणि my mahanagar live याची पुष्टी करत नाही, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा – World Health Day : जागतिक आरोग्य दिन, 2026 वर्षातील थीम काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.