मानोरा: तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नुकत्याच पार पडलेल्या यात्रोत्सवा पश्चात मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिकचा कचरा खाऊन स्थानिकांच्या गायी दगावल्या असून, या मयत गुरांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी गोपालकांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आले आहे.
श्री रामनवमी दरम्यान तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे लाखोंच्या संख्येने यात्रेकरू येतात. भाविक आपली मनोकामना फेडण्यासाठी येथे पूजा विधी आणि प्रसाद करतात. प्रसाद खाल्ल्यानंतर प्लॅस्टिकच्या लाखोंच्या संख्येत पत्रावळी, ग्लास, वाट्या अस्ताव्यस्त फेकून देतात.
Premium|Stress management guide : ताणतणावावर सोपे उपाय; श्वास, झोप, व्यायाम, हसू आणि सकारात्मक विचारांनी मन शांत कसे ठेवावेत्यामुळे मंदिर परिसर आणि पोहरादेवीच्या आजुबाजूचा काही किमी परिघामध्ये या प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्या यांचा खच साचलेला असतो. भर उन्हाळ्यात यात्रा भरत असल्याने स्थानिक गोपालकांचे गाईगुरे फेकून दिलेल्या अन्नासोबतच हे प्लास्टिक सुद्धा खाऊन घेत असल्यामुळे अपचनाची समस्या निर्माण होऊन अनेक गुरांच्या जिवावर बेतले.
स्थानिक विजय राठोड, सुनील राठोड आणि लालसिंग राठोड यांच्या जनावरांनी प्लास्टिक पन्नीमध्ये असलेले अन्न खाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदारपणामुळे जनावर दगावले असल्याचा त्यांनी आरोप केला.
Washim News: प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री!; कारंजात नगरपरिषदेची भूमिका संशयास्पद; कारवाईची मागणी प्लास्टिक सर्वांसाठी घातकपोहरादेवी यात्रा परिसरात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर तहसील प्रशासनाने एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून आपली पाठ काही मंडळींच्या माध्यमातून थोपटून घेतल्याने ही समस्या निकाली निघणार नसल्याचे बोलले जात आहे. यात्रा परिसर आणि पोहरादेवीच्या आजुबाजूला प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा गाई-गुरांसाठी आणि मानवांसाठीही घातक ठरू पाहणारा कचरा भविष्यात जमा होऊ नये यासाठी दीर्घकालीन व शाश्वत उपाय योजना राबवने गरजेचे असल्याचे समोर येत आहे.