Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं 52 हजारांनी स्वस्त, आजचे भाव ऐकून लगेच घ्याल सोनाराकडे धाव, 10 ग्रॅम सोन्याचा दर किती ?
Tv9 Marathi April 07, 2026 12:45 PM

Gold Rate Today In India : महिन्याभरापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यावरही इराण वि. अमेरिका-इस्रायल संघर्षातून काहीही तोडगा निघालेला नाही. गेले अनेक दिवस हे युद्ध अविरतपणे सुरूच असून त्याचा जागतिक स्तरावर तसेच बाजारावरही प्रचंड परिणाम होतोय. एकीकडे तेलाचं संकंट कायम असतानाच जागतिक बाजारात सोनं-चांदी यां मौल्यवान धातूंचे दरही सातत्याने बदलताना दिसत आहेत. सध्या सोन्याची आणि चांदीची चमक चांगलीच फिकी पडली आहे. त्यांचे दर सातत्याने घसरत आहेत. भारताची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅममागे फक्त 10 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याच्याही दरात अवघी 10 रुपयांची वाढ दिसून आली.

गेल्या दोन दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम मागे 280 रुपयांनी तर 22 कॅरेट सोनं हे प्रति 10 ग्रॅम, 260 रुपयांनी स्वस्त झालं आहे. याचवर्षी सोन्याने एकेकाळी 2 लाखांचा टप्पा पार करत 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमसाठी 2 लाख 02 हजार 984 रुपये हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. सोन्याचे हे गगनाला भिडलेले भाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर सोनं सातत्याने खाली घसरत असून सध्या या मौल्यवान धातूची किंमत दीड लाखांच्या आसपास आहे. म्हणजेच सर्वकालिक उच्चाकांच्या तुलनेत सोनं जवळपास 52 हजारांनी स्वस्त झालं असून ग्राहकांसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी गुंतवणूकदारांना मात्र सोन्यात पैसे गुंतवायचे की नाही असाच प्रश्न पडला आहे.

तुमच्या शहरात आज किती आहेत सोन्याचे दर ?

देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे ते जाणून घेऊया..

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 50 हजार 800 रुपये तर 22 कॅरेटची किंमत 1 लाक 38 हजार 240 रुपये आहे आणि 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1 लाख 13 हजार 130 रुपये मोजावे लागतील . तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ही दिल्लीपेक्षा थोडीशी कमी म्हणजेच 1 लाख 50 हजार 650 रुपये, 22 कॅरेटचा दर 1 लाख 38 हजार 090 रुपये आणि 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा सोन्याचा दर हा 1 लाख 12 हजार 980 रुपये इतका आहे.

शहर  24 कॅरेट10 ग्रॅम गोल्ड भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड भाव 18 कॅरेट 10 ग्रॅम गोल्ड भाव
दिल्ली ₹1,50,800 ₹1,38,240 ₹1,13,130
मुंबई ₹1,50,650 ₹1,38,090 ₹1,12,980
कलकत्ता 1,50,650 ₹1,38,090 ₹1,12,980
चेन्नई ₹1,52,630 ₹1,39,910 ₹1,16,710
बंगळुुरू ₹1,50,650 ₹1,38,090 ₹1,12,980
हैदराबाद ₹1,50,650 ₹1,38,090 ₹1,12,980
लखनऊ ₹1,50,800 ₹1,38,240 ₹1,13,130
पाटणा ₹1,50,700 ₹1,38,140 ₹1,13,030
जयपुर ₹1,50,800 ₹1,38,240 ₹1,13,130
अहमदाबाद ₹1,50,700 ₹1,38,140 ₹1,13,030

सलग चार दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदीच्या भावात घसरण

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, सलग चार दिवस दर स्थिर राहिल्यानंतर दिल्लीत चांदीच्या दरात प्रति किलोग्राम 100 रुपयांची घट झाली आहे. सध्या दिल्लीत एक किलोग्राम चांदी 2 लाख 49 हजार 900 रुपयांना विकली जात आहे. इतर प्रमुख महानगरांमध्ये, मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचे हेच दर पहायला मिळत आहेत. मात्र, चेन्नईमध्ये एक किलोग्राम चांदी आणखी महाग असून त्याचे भाव 2 लाख 60 हजार 100 रुपये इतके आहेत. म्हणजेच या चार महानगरांपैकी, चेन्नईतील चांदी सर्वात महाग आहे.

भविष्यात कशी असेल सोनं चांदीच्या किमतींची स्थिती ?

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस या ब्रोकरेज फर्मचे प्रणव मीर यांच्या मते, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले इराण-अमेरिका युद्ध यावरून सोनं आणि चांदीच्या हालचाली निश्चित होतील. याव्यतिरिक्त, या आठवड्यात सोने आणि चांदीचे गुंतवणूकदार सेवा पीएमआय डेटा, अमेरिकेतील टिकाऊ वस्तू, GDP, PCE निर्देशांक आणि CPI चलनवाढीच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून असतील. गुंतवणूकदार आरबीआयच्या धोरणावरही बारकाईने लक्ष ठेवून असतील. भारत सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीचा आधारभूत दर कमी केला आहे, ज्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चांदीची आयात किंमत सुमारे १४ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर परदेशातून सोन्याची आयात सुमारे 7.6 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. यामुळे दागिन्यांच्या कंपन्यांचा खर्च कमी होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.