Baramati Election: माघार न घेतल्यास काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव अटळ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शरद पवारांनी काँग्रेसला योग्य सल्ला द्यावा!
esakal April 07, 2026 02:45 PM

पुणे : ‘‘बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा ऐतिहासिक आणि मोठा पराभव अटळ आहे,’’ असा आक्रमक इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिला. काँग्रेसने हट्ट सोडून तातडीने माघार घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune Airport News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! चार नव्या शहरांसाठी पुण्याहून उड्डाण; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉटना मंजुरी..

भाजपच्या स्थापनादिनानिमित्त पुणे शहर कार्यालयात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर मंजूषा नागुपरे, शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमध्येच घडला आहे, हे विसरून काँग्रेस वागत आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नाही. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.’’

काँग्रेसने माघार न घेतल्यास बारामतीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान घेत त्यांचा धुव्वा उडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला योग्य सल्ला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार; राज्य शासनाची सुधारित आखणीला मंजुरी, नेमका कसा असेल मार्ग.. जुन्या कार्यकर्त्यांचा विसर नको : मिसाळ

स्थापनादिनानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांना छोटेखानी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, की भाजपमध्ये अनेकांना प्रवेश दिला जात आहे. विविध पक्षातील कार्यकर्ते येत आहेत. मात्र, त्यावेळी ज्यांनी भाजपला वाढविण्यासाठी कष्ट घेतले, अशा जुन्या लोकांचा विसर पडू देऊ नका, त्यांना पक्षात सन्मान मिळाला पाहिजे. दरम्यान, भाजपमध्ये निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहे, त्यांना उमेदवारी मिळाली, पदही मिळाले. मात्र, अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाकडून न्याय मिळेल, यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मिसाळ यांनी मांडलेल्या भूमिकेची भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.