आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. तर आता क्रिकेटचा देव विराट कोहलीने आणि आनुष्काने ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाबाबत मत व्यक्त केले आहे.
‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडल, इन्स्टाग्रामवर कोहलीने लिहिले, रणवीर, या चित्रपटानंतर तू एका नव्या उंचीवर पोहोचला आहेस. तुझा अभिनय अप्रतिम होता. अगदी शानदार, “आज चित्रपट पाहिला आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, भारतात बनलेला असा चित्रपट अनुभव देणारा चित्रपट मी यापूर्वी कधीही पाहिला नाही. आदित्य धर, तुमची प्रतिभा आणि तुमची दूरदृष्टी या चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते. तुमच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट.
अनुष्का शर्मानेही चित्रपट आणि रणवीरचे (ranveer)कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, आदित्य धर, तुम्ही किती अप्रतिम चित्रपट बनवला आहे. असा चार तासांचा चित्रपट बनवण्यासाठी खूप दृढनिश्चय लागतो. हा एक पकड घेणारा, भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारा, उत्कृष्टपणे बनवलेला चित्रपट आहे. हा चित्रपट कल्पनेपलीकडचा आहे, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
धुरंदर 2 या चित्रपटाने आतापर्यंत उत्तम कमाई करत अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात भर निर्माण केले आहेत अशा चित्रपटांना या चित्रपटाने अगदी कमी कालावधीत कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
11व्या वर्षी नॅशनल अवॉर्ड विजेती, पण नंतर वादांच्या भोवऱ्यात अडकूनही आज OTT क्वीन म्हणून कमबॅक