नाशिक : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासाची माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी दिली आहे. तेजस्वी सातपुते यांनी भोंदू अशोक खरात विरोधात किती गुन्हे दाखल आहेत. अशोक खरातचा महिलांच्या शोषणाचा पॅटर्न काय होता? अशोक खरात प्रकरणातील एसआयटीच्या टीमनं सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्यात आल्याची माहिती देखील तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
या तारखेपासून तो गुन्हा आणि त्याशिवाय ते दहा गुन्हे असे एकूण 11 गुणे एसआयटी कडे तपासाला आहेत. सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपाधीक्षक आहेत जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत त्याच पद्धतीने सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे. त्यापैकी काही लोक इतर उपस्थित आहेत काही लोक उपस्थित राहू शकले नाहीत. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या.
बारा गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करतेय, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. तर एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्या दोन गुन्ह्यांचा देखील तपास आम्हीकरत आहे. त्यामुळे अशोक खरात विरोधातील 9 आणि त्याच्या विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली.
अशोक खरात विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. आणि उर्वरित तीन गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्या सोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिकऑफेन्स संदर्भातील कलमांचा समावेश आहे, असं सातपुते यांनी सांगितलं.
महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व आठ गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा असे नमुने एसआयटी कडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडं आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे आणि पिडितांकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पिडीत व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधि इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. महिलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता.त्याच पद्धतीने ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भाषण समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता, असं निष्पन्न होत आहे, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या.
महिला अत्याचाराच्या संदर्भात दाखल आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने सामोर आले समोर आलेले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे त्याच्यामुळेच आपण आरोपी वरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या महिलांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ न पसरवणे हे आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे, असं तेजस्वी सातपुते म्हणाल्या.
आणखी वाचा