DC vs GT: गुजरात टायटन्ससमोर फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान, आकडेवारी काय सांगते?
GH News April 07, 2026 09:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 14व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यात खरं पाहिलं दिल्ली कॅपिटल्सचा वजन अधिक दिसत आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर याच्या बरोबर उलट चित्र गुजरात टायटन्सच्या बाबतीत आहे. गुजरात टायटन्सने सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्सवर विजयाचं दडपण असणार आहे. हा सामना गुजरातने गमावला तर प्लेऑफच्या वाटेला मोठा धक्क बसू शकतो. कारण त्यानंतर सलग सामने जिंकण्याचं आव्हान संघावर येऊ शकते. त्यामुळे साखळी फेरीच्या सुरूवातीला विजयी घोडदौड कायम ठेवणं अपेक्षित आहे. दिल्ली कॅपिटल्सला गुजरात विरूद्धचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. यात दोन्ही संघांमध्ये तुल्यबल लढत पाहायला मिळाली आहे. गुजरात टायटन्सने 4 , तर दिल्ली कॅपिटल्सने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मागची आकडेवारी पाहता तसं सांगणं कठीण आहे. मात्र या स्पर्धेतील मागच्या दोन सामन्यांच्या निकालावरून आकलन करायचं झालं तर दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. गुजरात टायटन्सची दिल्लीविरूद्ध सर्वोच्च धावसंख्या ही 220, तर दिल्ली कॅपिटल्सची गुजरात टायटन्सविरूद्धची सर्वोच्च धावसंख्या ही 224 आहे. सर्वात कमी धावसंख्येबाबत बोलायचं तर गुजरात टायटन्सने 89, तर दिल्ली कॅपिटल्सने 92 धावांनी नोंद एकमेकांसमोर केली आहे.

नाणेफीचा कौल

गुजरात आणि दिल्ली यांच्यात एकूण 7 सामने पार पडले आहेत. त्यापैकी चार सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सने, तर तीन सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने जिंकला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने चारही वेळा प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने 3 वेळा नाणेफेक जिंकली असून एकदा फलंदाजी आणि दोन वेळेस क्षेत्ररक्षण निवडलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.