भाट्ये पुलालगत साईडपट्टीला धोकादायक खड्डा
esakal April 07, 2026 10:45 PM

-rat७p२२.jpg-
26O35915
रत्नागिरी : भाट्ये पुलाजवळ साईडपट्टीला पडलेला खड्डा
-----
भाट्ये पुलालगत धोकादायक खड्डा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : शहरालगतच्या भाट्ये पुलाला लागून भाट्ये गावच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या साईडपट्टीला मोठा खड्डा तयार झाला आहे. एक दुचाकी खाली जाईल एवढी त्याची उंची आहे. यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा भरावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भाट्ये पुलालगतच पुलावरून खाली उतरण्यासाठी साईडपट्टीवरून रस्ता तयार झाला आहे. या साईडपट्टीला चार ते पाच फुटाचा खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा दिसत नसल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी अपघाताची मोठी शक्यता आहे. एक दुचाकी खाली जाईल एवढा हा खड्डा आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बांधकाम विभागाने यात लक्ष घालून ही साईडपट्टी बुजवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.