Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी
esakal April 08, 2026 12:45 AM

वेल्हे : राजगड तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत कोयत्याचा धाक दाखवत लाखोंची लूट करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 18 तासात जेरबंद केले आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात आज हजर केले असता १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.

प्रसाद सतीश शिंदे (वय.22) रा.शनीनगर,कात्रज,पुणे.व अभिषेक सचिन खुटवड (वय.23) रा.संतोषनगर,कात्रज,पुणे.अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून रविवार (ता.05) रोजी निगडे गावच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. यामध्ये राहुल चंद्रकांत कोंढरे रा.पुणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती सुमारे पाच लाख 67 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.

याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल ,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, हेड कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत ,तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अतुल ढेरे ,राजू मोमीन ,यांनी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी अधिकारी किशोर शेवते करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.