मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली
esakal April 08, 2026 12:45 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बदल्यांचा धडाका सुरु आहे. आजही राज्य सरकराने ११ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. आता पुन्हा सरकारने ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

कोणाची कुठं बदली?
  • राहुल रंजन महिवाल (आयएएस:आरआर:२००५), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली आहे.

  • कन्हूराज बागटे (आयएएस:एससीएस:२०११) यांची महावितरण, कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.

  • लक्ष्मण राऊत (आयएएस:एससीएस:२०१५), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण
  • श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:२००९) यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

  • रुचेश जयवंशी (आयएएस:आरआर:२००९) यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे.

  • गीतांजली बाविस्कर (आयएएस:एससीएस:२०१५), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.

  • डॉ. दिलीप जगदाळे (आयएएस:एससीएस:२०१५), सह व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.

  • करिश्मा नायर (IAS:RR:2021) अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • अमित रंजन (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण
  • पंकज देवरे (आयएएस:एससीएस:२०१६) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे बदली झाली आहे.

  • मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.